सुनित फ्रान्सिस रॉड्रिगेज | |
कार्यकाळ १६ नोव्हेंबर २००४ – २२ जानेवारी २०१० | |
मागील | अखलाकुर रहमान किडवाई |
---|---|
पुढील | शिवराज पाटील |
कार्यकाळ १ जुलै १९९० – ३० जून १९९३ | |
मागील | विश्वनाथ शर्मा |
पुढील | बिपिनचंद्र जोशी |
जन्म | १९ सप्टेंबर, १९३३ मुंबई |
जनरल (निवृत्त) डॉ. सुनित फ्रान्सिस रॉड्रिगेज ( १९ सप्टेंबर १९३३) हे भारताचे एक निवृत्त लष्करी अधिकारी, माजी लष्करप्रमुख व पंजाब राज्याचे भूतपूर्व राज्यपाल आहेत. डिसेंबर १९५२ मध्ये लष्करात प्रवेश मिळवलेले रॉड्रिगेज ४१ वर्षे लष्करसेवा केल्यानंतर ३० जून १९९३ रोजी निवृत्त झाले. त्यांना लष्करी कारकिर्दीदरम्यान विशिष्ट सेवा पारितोषिक व परम विशिष्ट सेवा पारितोषिक ही दोन शांतताकालीन पारितोषिके मिळाली.
२००४ ते २०१० दरम्यान रॉड्रिगेज पंजाबचे राज्यपाल व चंदिगढचे प्रचालक ह्या पदांवर होते.