ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००६-०७ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १६ – २० फेब्रुवारी २००७ | ||||
संघनायक | स्टीफन फ्लेमिंग | मायकेल हसी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग मॅकमिलन (१६९) | मॅथ्यू हेडन (२१९) | |||
सर्वाधिक बळी | शेन बॉंड (६) | शेन वॉटसन (५) | |||
मालिकावीर | शेन बॉंड (न्यू) |
१६ ते २० फेब्रुवारी २००७ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील तिसरी मालिका होती. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने दणदणीत पराभव करून चषक आपल्या नावावर करून घेतला. मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड समोर ३४७ धावांचे लक्ष्य होते. न्यू झीलंडने सदर सामना १ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. एकदिवसीय इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[१]
वि
|
||
वि
|
||