ओमप्रकाश चौटाला ( १ जानेवारी १९३५) हे भारतामधील हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे नेते आहेत. मुख्यमंत्री असताना १९९९ ते २००० या काळात चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केली. या प्रकरणी सीबीआयने चौटाला आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध ६ जून २००८ मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. १६ जानेवारी २०१३ रोजी यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर ५३ जणांना न्यायालयात दोषी ठरविले गेले व अटक करण्यात आली. २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने यांना दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनाविली.[१][२]
भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत देवीलाल ह्यांचे चौटाला हे पुत्र आहेत.