कजरी

बनारस, मिजापूर इत्यादी भागांमध्ये ब्रज भाषेतील शृंगाररसप्रधान असा हा गीतप्रकार गायिला जातो. या कजरी गीतप्रकारामध्ये वर्षा ऋतू, श्रावण ऋतू, राधाकृष्ण लीलाच वर्णन, विरह वर्णन इत्यादींचा समावेश असतो. काफी, खमाज, झिंझोटी इत्यादी रागांमध्ये कजरी गायिली जाते. दादरा, केरवा, धुमाळी इत्यादी तालांचा वापर या गीतप्रकारासाठी केला जातो.