Indian writer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २५, इ.स. १९८४ अमृतसर | ||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
कनिका धिल्लन (जन्म: २५ ऑगस्ट १९८४, अमृतसर) एक भारतीय निर्माती, लेखिका आणि पटकथा लेखक आहे ज्या भारतीय मनोरंजन उद्योगातील योगदानासाठी ओळखल्या जातात. बॉम्बे डक इज अ फिश (२०११), शिवा अँड द राइज ऑफ द शॅडोज (२०१३), आणि द डान्स ऑफ दुर्गा (२०१६) या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.
धिल्लनने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत केली आणि शाहरुख खानच्या निर्मिती कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट यासाठी पटकथा पर्यवेक्षक म्हणून काम केले. तिने कंपनीच्या २००७ च्या ओम शांती ओम चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.[१][२][३] २०१८ मध्ये, लोकप्रिय रोमँटिक चित्रपट मनमर्जियां (२०१८) सह धिल्लनला पटकथा लेखक म्हणून व्यापक ओळख मिळाली. त्यानंतर केदारनाथ (२०१८), जजमेंटल है क्या (२०१९), गिल्टी (२०२०), हसीन दिलरुबा (२०२१), रश्मी रॉकेट (२०२१) आणि रक्षा बंधन (२०२२) यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले. २०२२ मध्ये, तिला तिच्या हसीन दिलरुबा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. रश्मी रॉकेटसाठी तिला त्याच वर्षी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संवादासाठी देखील नामांकन मिळाले होते.[४][५]
२०११ मध्ये प्रकाशित झालेली बॉम्बे डक इज अ फिश ही तिची पहिली कादंबरी होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग होण्यासाठी धडपडणाऱ्या एका मुलीची ही उपहासात्मक कथा होती.[६] २०१२ च्या जगबुडीच्या कल्पनांपासून प्रेरित होऊन तिने २०१३ मध्ये तिचे पुढील पुस्तक, शिवा अँड द राइज ऑफ द शॅडोज प्रकाशित केले.[७] धिल्लोंची तिसरी कादंबरी, द डान्स ऑफ दुर्गा, २०१६ मध्ये प्रकाशित झाली. ती रज्जो, या भोळ्या तरुणीची कथा सांगते, जी एका भोंदूबाबामध्ये बदलते.[८]
कनिका ढिल्लनचा जन्म अमृतसर येथे झाला आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. कनिकाने २०१४ मध्ये तिचा पहिला पती, दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी याच्याशी लग्न केले आणि २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. पण या जोडप्याने २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट जाहीर केला. कनिकाने तिच्या पतीसोबत दोन चित्रपटांसाठी काम केले: साईज झिरो आणि जजमेंटल है क्या.[९]
जानेवारी २०२१ मध्ये कनिकाने हिमांशू शर्मासोबत लग्न केले. शर्मा देखिल चित्रपट लेखक आणि निर्माता आहेत, जे त्यांच्या तनु वेड्स मनु (२०११, २०१५) आणि रांझणा (२०१५) या चित्रपटांसाठी ओळखले जातात.[१०][११]
वर्ष | चित्रपट | कार्य | नोट्स |
---|---|---|---|
२००७ | ओम शांती ओम | सहाय्यक संचालक | |
२००९ | बिल्लू | स्क्रिप्ट पर्यवेक्षक | |
२०११ | ऑल्वेज कभी कभी | अतिरिक्त पटकथा | |
रा.वन | पटकथा आणि संवाद | ||
२०१५ | साइझ झिरो | पटकथा | तेलुगु - तमिळ द्विभाषिक चित्रपट |
२०१८ | मनमर्जियां | कथा, पटकथा आणि संवाद | |
केदारनाथ | |||
२०१९ | जजमेंटल है क्या | ||
२०२० | गिल्टी | नेटफ्लिक्स रिलीज | |
२०२१ | हसीन दिलरुबा | ||
रश्मी रॉकेट | पटकथा आणि संवाद | झी फाईव्ह रिलीज | |
२०२२ | एक व्हिलन रिटर्न्स | कथा | |
रक्षाबंधन | |||
२०२३ | डंकी |