Kamalabai Gokhle | |
---|---|
![]() | |
जन्म |
1909 मुंबई, ब्रिटिश भारत |
मृत्यू | 1997 (aged 87–88) |
राष्ट्रीयत्व |
![]() |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | आनंद नानोसकर |
आई | दुर्गाबाई कामत |
पती | रघुनाथराव गोखले |
अपत्ये |
• चंद्रकांत गोखले, • लालजी गोखले, • सूर्यकांत गोखले |
कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम बाल स्त्री-कलाकार होत्या. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटात काम केले.[१]
कमलाबाई या दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधील प्राध्यापक आनंद नानोसकर यांची कन्या होत. रघुनाथ गोखले हे त्यांचे पती. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले होत. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते तर चंद्रकांत गोखले चित्रपट आणि नाट्य अभिनेता होते. चंद्रकांत गोखले यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत.