हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
करण थापर (नोव्हेंबर ५, इ.स. १९५५ - हयात) हा दूरचित्रवाणीवरील भारतीय मुलाखतकार, पत्रकार, उद्योजक आहे. त्याने द टाइम्स या इंग्लिश वृत्तपत्रातून पत्रकारितेतील कारकिर्दीस आरंभ केला. पुढे इ.स. १९८२ ते इ.स. १९९३ सालांदरम्यान अकरा वर्षे तो लंडन वीकेंड टेलिव्हिजन या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये टीव्ही-पत्रकारिता केली. त्यानंतर त्याने द हिंदुस्तान टाइम्स टेलिव्हिजन ग्रुप, होम टीव्ही, युनायटेड टेलिव्हिजन या कंपन्यांतून कामे केल्यावर इ.स. २००१ साली इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन ही स्वतःची चित्रवार्तानिर्मिती कंपनी स्थापली.