करमाळा

  ?करमाळा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१८° २५′ १२″ N, ७५° १२′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राशिन
विभाग पश्चिम महाराष्ट्र
जिल्हा सोलापूर
भाषा मराठी
तहसील करमाळा
पंचायत समिती करमाळा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 413202
• MH45


करमाळा is located in India
करमाळा
करमाळा
करमाळा (India)

करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. करमाळा हे नगरपरिषद असलेले शहर आहे. ही स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांची कर्मभूमी आहे.

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व

[संपादन]

करमाळा हे कमलादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.[] हे मंदिर राऊराजे निंबाळकर यांनी इ.स. १७२७ साली बांधले. या देवीस तुळजापूरच्या तुळजा भवानीचा अवतार मानले जाते. या मंदिरात ९६ या अंकाचे खूप महत्त्व आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीने बांधलेल्या या मंदिराचे एक प्रवेशद्वार आग्नेय दिशेला तर दुसरे उत्तर दिशेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास ९६ खांब व ९६ खिडक्या आहेत. मंदिरात ९६ चित्रे आहेत व मंदिरातील विहिरीस ९६ पायऱ्या आहेत. येथे नवरात्रीचा सण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत येथे वार्षिक यात्रा असते. कमलादेवी मंदिराच्या इतिहासवर येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांनी जय अंबे कमलाभवानी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात कमलादेवीच्या भव्य मंदिराची आणि करमाळा परिसराच्या इतिहासाबद्दल सखोल माहिती आहे.

करमाळा तालुक्यातील बाळेवाडी ही सीना नदीकाठावरील संत यादवबाबांची जन्मभूमी आहे.

भौगोलिक

[संपादन]

या तालुक्यातून सीना व भीमा नदी गेली आहे. त्यामूळे नदीकडचा भाग बागायत आहे. या भागात ऊसाची जास्त लागवड केली जाते. तसेच या तालुक्यातून रेल्वेमार्ग जातो.

तालुक्यातील गावे

[संपादन]

करमाळा तालुक्यातील काही गावे (वर्णानुक्रमे):

बाळेवाडी, वीट,अंजनडोह,कामोणे, कुंभेज, केम, कोंढेज, गुळसडी, खडकी (करमाळा), खडकेवाडी, जेऊर, तरटगाव, देवळाली, पांगरे, पांडे, पुनवर, भोसे, मांगी, वरकटणे, शेलगाव, सर्पडोह, साडे, घोटी, सालसे, निमगांव

हिंगणी, पारेवाडी, सौंदे, रावगाव, बोरगाव, खांबेवाडी, पाडळी, घारगाव, निलज, पोथ्रे, वांगी, जिंती, भिलारवाडी, देलवडी, उंदरगाव, निमगांव 

निंभोरे, जेऊरवाडी, कोंढेज, मलवडी, पाथुर्डी, कंदर, बिटरगाव, गुळसडी (गुरसुळी), शेटफळ, पांडे, हिसरे, शेलगाव (क), फिसरे, सातोली, वडशिवणे, ढोकरी, वांगी-1 ते 4, उमरड,पु.सोगाव वाशिंबे, केत्तुर, पोमलवाडी, खडकेवाडी,केडगांव, लव्हे , कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हण, पोथरे , खातगाव, मांजरगाव , कात्रज, कोंढार चिंचोली, टाकळी , कोर्टी , विहाळ , मोर्वाड , कुगाव बिटरगाव , गोयेगाव , कंदर , पांडे , अर्जुननगर



संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरील करमाळ्याबद्दलचे पान". 2008-02-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २००७-०९-३० रोजी पाहिले.
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate