करुणा विजयकुमार करु जैन (९ सप्टेंबर, १९८५:बेंगलुरु, कर्नाटक, भारत - ) ही भारतमहिला क्रिकेट संघाकडून २००४-१४ दरम्यान ५ कसोटी, ४४ एकदिवसीय आणि ९ टी२० सामने खेळेलेली खेळाडू आहे. हीउजव्या हाताने फलंदाजी करीत असे तसेच यष्टीरक्षक होती. तिने १ एकदिवसीय शतक आणि नऊ अर्धशतके केली. [१] तिने कर्नाटक, एर इंडिया, नागालँड आणि पाँडेचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले. [२] जुलै २०२२ मध्ये तिने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली [३]
जैनचे वडील स्पर्धात्मक बॉक्सर होते आणि तिची आई बॉल बॅडमिंटन खेळायची. [४]