कऱ्हाडे ब्राह्मण

कऱ्हाडे ब्राह्मण
(कऱ्हाडा ब्राह्मण)


झाशीची राणी लक्ष्मीबाई  •  • गोविंद वल्लभ पंत  •
प्रमुख लोकसंख्या ;
लक्षणीय लोकसंख्या ;
इतर ;
भाषा = मराठी, कोंकणी
एकूण लोकसंख्या
लोकसंख्येचे प्रदेश
भाषा
धर्म


नर्मदा ते तुंगभद्रा नदी या दरम्यान करहाटक प्रांत

कऱ्हाडे ब्राह्मण किंवा कऱ्हाडा ब्राह्मण ही मराठी ब्राह्मणांतील सात प्रमुख पोटजातींपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीय ब्राह्मण जातीतील इतर ३ पोटजाती देशस्थ, चित्पावनकऱ्हाडे ब्राह्मण ह्या आहेत.

कऱ्हाडे ब्राह्मणांची आडनावे

[संपादन]

आगटे, ओरपे, सांड्ये , आठल्ये, आंबेकर, ओळकर,करकरे, करंबेळकर, कशाळकर, कामतेकर, काजरेकर,वायंगणकर, काकिर्डे, कानडे, किर्लोस्कर, किराणे, कुलकर्णी, केंगार , नानिवडेकर, कोनकर, खांडेकर, खेर, गर्दे, गुर्जर, गुण्ये, गोडे, गोविळकर, गोळवलकर, घाटे, घुगरे, चांदोरकर, जठार, जांभेकर, जेमिनीस, जोशी, टिकेकर, ठाकूर, ठाकूरदेसाई, ढवळे, ताटके, तांबे, दत्ते, धाक्रस, धुपकर, दीक्षित, देऊस्कर, देव, देवस्थळी, देसाई, नवरे, नवाथे, पंडित, पंत, पराडकर, पळसुले, पाध्ये (गुर्जर पाध्ये, मोघे पाध्ये), पारसे , पाळेकर, पुराणिक, पुरोहित, प्रभुघाटे, प्रभुदेसाई, फणसळकर, फळणीकर, बेर्डे, बेलवलकर, बोंद्रे, बोंडाळे, भागवत, भाट्ये, भांडारी, मावळणकार, मोघे,मुंडले, मुठये, मंडपे, रायकर, लळीत, लागवणकर, वळामे, शेवडे, शेंबेकर, श्रीखंडे, सप्रे, सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरवटे, सातवळेकर, हर्डीकर, हर्षे, हळदे, हळबे, हिर्लेकर,मुळे, जठार,नाटेकर, कानेटकर, नाखरे, नाफडे, लघाटे, पोतदार, लुकतुके, माईणकर, खानविलकर, तळवलकर, काटदरे, कारखानीस, कुवळेकर, पित्रे इ.[ संदर्भ हवा ]शेजवलकर, शहाणे

अधिक माहिती

[संपादन]

कऱ्हाडे हे प्रादेशिक नाव आहे व ते करहाटक प्रांत व त्यातील करहाटक या शहर यांवरून पडलेले आहे. तसेच दक्षिणी ब्राह्मणांतला तो एक पोटभेद आहे. कऱ्हाडे ब्राह्मण हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा, आदि भागात सर्वत्र पसरलेले आहेत. कऱ्हाडातील ५४५ उपनामांपैकी २०२ उपनामे, गावांच्या नावांपुढे ‘कर’ असा प्रत्यय लावून बनवलेली आहेत. त्यांची एकूण २४ गोत्रे आहेत. सर्व कऱ्हाडे ब्राह्मण एकवेदी (ऋग्वेदी), एक सूत्री (आश्वलायन सूत्री) व एक शाखी (शाकल शाखी आहेत). बहुतेक कऱ्हाडे स्मार्त असून अद्वैत मतानुयायी आहेत. काही कऱ्हाडे वैष्णवही आहेत; पण ते त्या मानाने फारच थोडे आहेत. बहुतेक कऱ्हाड्यांची देवता कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे. तथापि गोमन्तकातील कऱ्हाड्यांच्या कुलदेवता म्हाळसा,आर्यादुर्गा, महालक्ष्मी आदि आहेत. अनंत चतुर्दशीची पूजा, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी व नवरात्रात सप्तशतीचे पाठ आपल्या कऱ्हाडे ज्ञातीत विशेषत्वाने आढळतात.[ संदर्भ हवा ]

करहाटक प्रांतातून कोकणात आगमन

[संपादन]

  महाराष्ट्रातील आजवर प्रसिद्ध झालेले निरनिराळ्या घराण्यांचे इतिहास पाहिले तर हे चटकन लक्षात येते की, करहाटक किंवा कऱ्हाड प्रांतातून ही ब्राह्मण घराणी प्रथम कोकणात गेली; व तेथूनच नंतर ती अन्यत्र गेली. असे दिसते की, दक्षिण कोकणची भूमी वसाहतीस योग्य झाल्यावर, शिलाहार राजे यांचे प्रोत्साहनमुळे, ती वसाहत करण्याकरिता निरनिराळ्या प्रदेशातून लोक आले व तेथे स्थाईक झाले. त्यापैकी आपली कऱ्हाडे ज्ञाती  ही एक होय.[ संदर्भ हवा ]

उदाहरणार्थ, मावळंकर (सरदेसाई, लळीत, गोविळकर) घराण्यांचे मूळपुरुष नृसिंहभट्ट सत्यवादी हे मुळचे पैठणचे. ते इ.स. ११५० चे सुमारास, संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे येथील जागृत नरसिंहाची उपासना करण्यासठी येथे आले व त्यांनी कडक तपश्चर्या केली. त्यायोगे त्यांना पुत्रलाभ झाला. त्यांचे नातवाला शिलाहार राजे विजयार्क यांचेकडून, इ.स. ११८५ चे सुमारास, संगमेश्वर गाव इनाम मिळाला.[ संदर्भ हवा ]

इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, नृसिंहभट्ट यांचे कऱ्हाड घराणे हे कोकणातील पहिले व महत्त्वाचे होय; व करहाटक ब्राह्मणांचे राजापूर-संगमेश्वर टापूंत आगमन यांचेबरोबर झाले.

तसेच, मराठवाड्यातील आंबेजोगाईतील खेर घराणे आले, ते कोंकणात नेवरे येथे स्थायिक झाले.

सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ‘आटोलि’ गावाहून इ. स.च्या अकराव्या शतकाच्या सुमारास आठल्ये आले व ते कोंकणात देवळे महालाचे ‘धर्माधिकारी’ बनले.

गुलबर्ग्याहून इ. स. १४२५ मध्ये पंडित (सरदेशपांडे, जेमिनीस, कुलकर्णी) हे देवळे, लांजे, हरचेरी, हातखंबा व पावस महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा घेऊन कोंकणात आले.[ संदर्भ हवा ]

ओरपे, सरपोतदार, कारखानीस, सबनीस आदी घराणी करहाटक प्रांतातून कोंकणात आली.

गुजराथेतून गुर्जर आले व ते राजापूरला स्थायिक झाले.

कदंबराजांनी (कमलादेवी व माधव मंत्री यांनी) कित्येक ब्राह्मण घराणी गोमंतकात नेली; व तेथे त्यांना इनामे दिली. त्यामुळे ते गोमंतकातच स्थायिक झाले. पुढे मुसलमान व पोर्तुगीज यांच्या आक्रमणामुळे त्यापैकी काही घराणी निर्वासित झाली व रत्‍नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात स्थायिक झाली. *ठाकूर देसाई, प्रभूदेसाई, अधिकारी देसाई* या घराण्यांची कुलदैवते गोमंतकातील आहेत; यावरून वरील विधानाला पुष्टीच मिळते. गोमंतकात अद्यापही कऱ्हाडे ब्राह्मणांची २०० कुटुंबे आहेत. म्हार्दोळ व शांतादुर्गा देवस्थानचे *महाजन पाध्ये* हे मुळचे पाध्ये होत. सध्या कऱ्हाडे हे सर्व भारतभर व बाहेरही पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर, काशी-रामेश्वर-नाशिक व नेपाळातील पशुपतेश्वर या देवस्थानातील क्षेत्रोपाध्याय कऱ्हाडेच आहेत. तथापि ते मुळात करहाटक प्रांतातून कोंकणात आले व कऱ्हाडे झाले हे खरे.[ संदर्भ हवा ]

कऱ्हाड्यांचे व्यवसाय : इतिहासकाळात बहुतेक कऱ्हाडे, हे खोत, इनामदार, सरदेसाई, देसाई, सरदेशपांडे, पोतदार, सरपोतदार, सरमुकादम, सबनीस, कारखानीस इत्यादी हुद्देदार होते. त्यामुळे त्या काळात त्या गावचे किंवा विभागाचे प्रमुखपद यांच्याकडे असे. सांप्रत कऱ्हाडे ब्राह्मण भारताच्या सर्व भागांत आढळतात व निरनिराळे व्यवसाय करतात.[ संदर्भ हवा ]

असामान्य बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या जोरावर कऱ्हाड्यांनी जीवनातील अनेक क्षेत्रे पादाक्रांत करून आपल्या पेशास विविधता आणली आहे. साहित्य, काव्य, राजकारण, नाटक, संगीत, इतिहास, शास्त्र, गणित शल्याचिकित्सा, चित्रकला, उद्योग, कारखानदारी वगैरे एकही क्षेत्र असे नाही की, जेथे कऱ्हाडा चमकला नाही.[ संदर्भ हवा ]

अद्वितीय रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतातील राजकारणपटुत्व असलेली पहिली स्त्री ठरते. मुंबई प्रांतातील पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर स्वतंत्र भारताचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर , भारताचे पोलादी गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत, आणि अनेकांनी भारतीय राजकारणात बहुमोल कार्य करून आपली नावे चिरस्मरणीय केली आहेत.

साहित्यातील कऱ्हाड्यांचे मानबिंदू

[संपादन]

नव्या युगाची नांदी करणारे ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर, ‘आर्या मयूरपंताची’ यथार्थत्वाने सार्थ करणारे मोरोपंत पराडकर, धर्मसिंधुकार पाध्ये, कादंबऱ्यानी रसिक महाराष्ट्रास डोलावणारे विठ्ठल सीताराम गुर्जर, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भाऊसाहेब खांडेकर, शंकरराव किर्लोस्कर, धनुर्धारी टिकेकर, महाकवी यशवंत, राजकवी भास्करराव तांबे,  महाराष्ट्र टाईम्सचे गोविंद तळवलकर, साहित्य संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष भालचंद्र पेंढारकर, माडखोलकर, प्रभाकर पाध्ये, श्री. रा. टिकेकर, काटदरे इ. अनेक नावे वानगीदाखल देता येतील.[ संदर्भ हवा ]

पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, पेंढारकर, जगन्नाथबुवा पुरोहित, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी आप कर्तृत्वाने संगीतक्षेत्र झळाळून टाकले. इतिहास संशोधनात रियासतकार सरदेसाई, शेजवलकर, प. कृ. गोडे यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. आजही आधुनिक महाराष्ट्राचे भीष्माचार्य (??) दादासाहेब पोतदार ते कार्य, या वयातही, नेटाने चालवीत आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात तर किर्लोस्कर, वसंत कानेटकर, शं. ना. नवरे यांनी नाटकांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अभिनयात पेंढारकर पती-पत्नी, प्रभाकर पणशीकर, दाजी भाटवडेकर, शरद तळवलकर हे लाजबाब आहेत.

आयुर्वेद म्हटला की धूतपापेश्वरचे पुराणिक, सांडू, गुण्ये हीच नावे डोळ्यासमोर येतात. स्वस्तिक रबरचे वैद्य, सप्रे, किर्लोस्कर प्रभृतीनी औद्योगिक महाराष्ट्र जगाच्या नकाशात नेऊन बसविला आहे. चित्रकलेत देऊसकर, सातवळेकर पितापुत्र, गुर्जर हे बिनीचे मानकरी ठरले आहेत. न्यायखात्यात न्या. ढवळे, न्या. तांबे, न्या. सप्रे ही नावे सर्वांच्या परिचयाची आहेत. नुसते तळवलकर हे आडनाव व्यायाम, डॉक्टरी, उद्योग वा अभिनय सुचविते. सुप्रसिद्ध गणिती जयंत नारळीकर यांनी अत्यंत तरुण वयात शास्त्रज्ञ म्हणून जगन्मान्यता मिळवली आहे.  

संदर्भ

[संपादन]

वि. वा. आठल्ये यांनी लिहिलेले ‘ कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास ’ हे पुस्तक. प्रथमतः त्यांनी तो आठल्या घराण्यांचा इतिहास, द्वितीय खंड, प्रकरण ३ म्हणून छापला व त्यानंतर इ. १९४७ साली त्यांनी त्यांचे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध केले. ते पुस्तक तूर्त दुर्मिळ आहे. सबब रत्‍नागिरी येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघ त्याची द्वितीय आवृत्ती काढण्याच्या विचारात आहे.

प. कृ. गोडे क्यूरेटर, भांडारकर प्राच्यविज्ञा संशोधन मंदिर, पुणे यांचा “कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातींचे मूळ व पुरातनत्व” हा निबंध. तो गुण्या घराण्याचा इतिहासात, परिशिष्ट नं ३ म्हणून छापलेला आहे.

The Tribes and Castes of Bombay by Enthoven(Vol. 1),

Castes Today by Taya Zinkin

The Bombay Gazetteer Vol. IX, Part I

त्रिंबक नारायण अत्रे यांचा ‘गांव-गाडा’ स्कंदपुराणातील ‘सह्याद्री खंड’

मो. वि. पटवर्धन यांचे ‘वर्ण व जाती’

महादेवशास्त्री दिवेकर यांचे ‘पोत-जातीचे एकीकरण’

वसंत सबनीस यांचे ‘पान-दान’

पं. महादेवशास्त्री जोशी संपादित ‘भारतीय संस्कृती कोश, खंड २’

नावाची उत्पत्ती

[संपादन]

प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदा वा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता.

गोत्रे

[संपादन]

कऱ्हाडे ब्राह्मणांतील गोत्रे खालीलप्रमाणे आहेत (कंसात आडनावे)

  1. अंगिरस
  2. अत्रि (सरपोतदार, फणसळकर, देवस्थळी, कुलकर्णी, श्रोत्री, नानिवडेकर, चिटणीस)
  3. उपमन्यु
  4. काश्यप (सरदेशपांडे, आठल्ये, पाध्ये, कानडे, वाईंगणकर, चिरमुले, ताटके)
  5. कुत्स (देसाई)
  6. कौंडिण्य
  7. कौशिक (तळवलकर, काकिर्डे)
  8. गार्ग्य (तांबे, पडळकर)
  9. गौतम (आंबिलकर)
  10. जामदाग्नि (सांड्ये , गर्दे, पराडकर)
  11. नैधृव (पाध्ये,गुर्जर)
  12. पार्थिव
  13. बादरायण
  14. भार्गव
  15. भारद्वाज (करंबेळकर,काजरेकर, धाक्रस,शेवडे )
  16. मुद्गल (मोघे, हळदे)
  17. लोहिताक्ष
  18. वत्स
  19. वासिष्ठ (तळवलकर)
  20. वैम्य
  21. वैश्वामित्र
  22. शांडिल्य
  23. शालाक्ष [ संदर्भ हवा ]

उल्लेखनीय व्यक्ती

[संपादन]

काही उल्लेखनीय कऱ्हाडे ब्राह्मण व्यक्ती[ संदर्भ हवा ]

  • वसंत सरवटे - सुप्रसिद्द व्यंगचित्रकार
  • पंडित सुरेश तळवलकर - प्रसिद्ध तबलावादक आणि गुरू