?काटोल (कुन्तलापूर) महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
[[महाराष्ट्र विभाग|विभाग]] | नागपूर |
भाषा | मराठी |
अनिल देशमुख | |
संसदीय मतदारसंघ | रामटेक |
तहसील | काटोल |
पंचायत समिती | काटोल |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 441302 • +०७११२ |
काटोल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. काटोल शहर हे त्याचे मुख्यालय आहे. शहरात एक चंडिकेचे व एक सरस्वतीचे अशी दोन पुरातन मंदिरे आहेत.
त्याचप्रमाणे येथे हनुमान मंदिर तळ्याची पार येथील हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून त्यालगतच असलेले शिवमंदिर अतिशय पुरातन आहे,शिवमंदिराचे बांधकाम अतिशय पुरातन शिल्पकलेने बनलेले असून प्राचीन काळापासून या मंदिरात गं.भा.नर्मदाबाई वैष्णव आणि त्यांचे वंशज सेवादान करीत आहेत.दरवर्षी येथे नवरात्री महोत्सव साजरा केला जातो,आणि हजारांच्या संख्येत भक्तजन दर्शनाला येतात आणि भव्य जत्रेचे आयोजन केले जाते,या शहराजवळ ८ मैल अंतरावर पारडसिंगा हे गाव वसलेले आहे, ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या या गावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथे श्री.अनुसया माता देवस्थान अतिशय दर्शनीय स्थळ असून शेकडो भाविकभक्त नित्यनियमाने दररोज दर्शनाला येतात देवस्थानासमोर एक उंच टेकडी असून याची उंची ३८९ फूट आहे,टेकडीवर पंचमुखी हनुमानाचे सुंदर मंदिर असून उंच जागी प्राचीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे,या टेकडीवर जाण्यासाठी मार्ग सुलभ व्हावा म्हणून संस्थानाने वाटेच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली आहेत, जागोजागी पाण्याचे हौद आहेत,त्याचप्रमाणे टेकडीच्या मागच्या बाजूला जड वाहने ये-जा करण्यासाठी २२६ मीटर लांबीच्या मार्गाचे निर्माण करण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |