किशोर कदम | |
---|---|
![]() किशोर कदम | |
जन्म |
किशोर कदम ९ नोव्हेंबर, १९६७ |
इतर नावे | सौमित्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | काय घडलं त्या रात्री? |
किशोर भानुदास कदम ऊर्फ सौमित्र (नोव्हेंबर ९, इ.स. १९६७ - हयात) हे मराठी कवी व अभिनेते आहेत. गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे. अभिनय आणि कविता अशा दोन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे, अनेक चित्रपटांमधून अभिनेते म्हणून त्यांनी काम केले आहे, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांतील कामांबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांमध्ये शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्काराचा समावेश आहे.
मुंबईच्या खार-कोळीवाडा भागात त्यांचे बालपण गेले. किशोर कदम यांनी बी.कॉम पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले.
शीर्षक | साहित्यप्रकार | प्रकाशक | प्रकाशन वर्ष (इ.स.) | भाषा |
---|---|---|---|---|
...आणि तरीही मी! | काव्यसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | मराठी | |
गारवा | काव्यसंग्रह | मराठी | ||
जावे कवितांच्या गावा | काव्यसंग्रह (सामूहिक) | डिंपल प्रकाशन | मराठी | |
बाउल | काव्यसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | २०१९ | मराठी |