किसी का भाई किसी की जान हा फरहाद सामजी दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्स निर्मित भारतीय हिंदी- भाषेतील अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश, पूजा हेगडे आणि जगपती बाबू सहाय्यक भूमिकेत आहेत. KKBKKJ या नावाने ओळखला जाणारा हा चित्रपट सलमान खान फिल्म्स निर्मित आहे. [१]
मुख्य छायाचित्रणाची सुरुवात मे २०२२ मध्ये झाली आणि डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई, हैदराबाद आणि लडाखमध्ये चित्रीकरणासह समाप्त झाली. तो 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. आणि रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 25.38 कोटींची कमाई केली.