?कुमठा (ಕುಮಟ) कर्नाटक • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
१५.३४ चौ. किमी • २ मी |
प्रांत | बायालु सीमे |
जिल्हा | उत्तर कन्नड |
लोकसंख्या • घनता |
३६,७१९ (२) (२०११) • २,३९४/किमी२ |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड |
• ५८१ ३४३ • +८३८६ • INBLR • KA-47 |
संकेतस्थळ: [http://www | |
कुमठा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील तालुक्याचे छोटे शहर आहे. हे शहर मडगावच्या दक्षिणेला १४२ कि.मी. आणि भातकलच्या उत्तरेला ५८ कि.मी. तसेच जिल्हा मुख्यालय कारवारपासून ७२.७ कि.मी. अंतरावर स्थित आहे. कोकण रेल्वेच्या मुंबई ते मंगळूर या रेल्वेस्थानकादरम्यानचे हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
कुमठा हे कर्नाटक राज्यातील समुद्राच्या हद्दीतील किनाऱ्यालगतचे शहर असून यापूर्वी कुम्पटा असे ओळखले जात होते.
पूर्वी यास कुंभपुरा नाव होते. ब्रिटिश राजवटीत हे नाव बदलले गेले.
ब्रिटिशकालीन मुंबई प्रांताचा उत्तर कानडा हा समुद्राजवळील बंदराचा भाग कापूस व्यापारासाठी विशेष प्रसिद्ध असे. अमेरिकेच्या नागरी युद्धादरम्यान दक्षिणेकडील कापसाची आयात मंदावल्याने इंग्लडच्या सूतगिरण्यामध्ये कुमटा बंदरावरील कापसाच्या आयातीमध्ये भर पडली.
कुमठा बंदरावरून ‘कुमठा हाती’ नावाने हा कापूस निर्यात होऊ लागला. याच्या परिणामाने कुमठा शहराच्या विकासाकडील वाटचालीस प्रारंभ झाला. यासह चंदनाच्या लाकडावरील कोरीव कामासाठी विशेष प्रसिद्धी मिळवली व अशा कोरीवकाम केलेल्या वस्तू बनवण्यात आल्या. परंतु दक्षिणेकडील महाराष्ट्रापासूनच्या रेल्वेमार्गाच्या सुरुवातीपासून मात्र कुमठा शहराच्या व्यापार व्यवस्थेला उतरती कळा लागली.
प्रख्यात बंगाली कवी व नोबेल विजेते क्षी. रविंद्रनाथ टागोर यांनी १८८२ मध्ये कुमठाला भेट दिली. त्यांनी आपल्या आत्मकथे तील एक प्रकरण कुमठाला समर्पित केले आहे. वयाच्या 22व्या वर्षी रविंद्रनाथ टागोर त्यांच्या भावासहित कुमठा येथे दाखल झाले. त्यावेळेस त्यांचे भाऊ उत्तर कानडा जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश होते.
विसाव्या शतकाच्या पूर्वोधापासून व्यापार आणि शिक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या कुमठा शहराच्या दोन शैक्षणिक संस्थाचा उदय झाला.
भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कानडा जिल्ह्यातील कुमटा शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे. कुमटा शहारसमीप विस्तीर्ण असा पश्चिम घाटाचा १४.४२ उ. ७४.४ पू. भाग आहे.
अरबीसमुद्राच्या किनाऱ्यालगत समर्पित होणारी अघनाशिनी नदी प्रमुख आकर्षण ठरली आहे. तसेच किनाऱ्यालगतचे गोकर्ण क्षेत्र विशेष प्रसिद्ध आहे. येथील याना हे गिर्यारोहणा साठी प्रसिद्ध आहे.
गोकर्ण | अंकोला | सिरसी | ||
अरबी समुद्र | सिद्दापूर | |||
कुमठा | ||||
अरबी समुद्र | मंगलोर | बंगलोर |
येथील हवामान उष्ण व दमट स्वरूपाचे आहे. पावसाळ्याच्या जोरदार वृष्टीमुळे येथील घरे उतरत्या छपराची आढळतात.
सर्व जाती, धर्म, पंथाचे एकूणच साधारणतः २ लाख लोकसंख्येचे हे छोटा शहर आहे.
आदिवासी जमातीचे लोक कुमठा येथे वास्तव्यास आहेत. जंगलातून मध, डिंक, सरपण, वनौषधी गोळा करून बाजारात विकून स्वतःचा उदरनिर्वाह भागवतात.
कुमठा शहरात कानडी, कोंकणी आणि मराठी या बोलीभाषांचा विशेषकरून उपयोग केला जातो.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ हा कुमठा शहराच्या मध्यभागातून जातो. राष्ट्रीय महामार्गापासून रेल्वेस्थानक व बसस्थानक जवळच्या अंतरावर आहेत.
वाहतूकीसाठी वायव्य कर्नाटक राज्य मार्ग महामंडळ कार्यरत आहे. कदंब वाहतूक महामंडळाच्या बसदेखील शहरात सेवेसाठी उपलब्ध आहेत.
कुमठा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ जातो. या महामार्गामुळे कुमठा शहरासमवेत उत्तरेकडील मुंबई, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, कारवार व दक्षिणेकडील भटकल, कुंदापूर, उडपी, मंगळूर आणि इडापली ही ठिकाणे जोडली आहेत.
कुमठा हे रेल्वे वाहतूकीच्या दृष्टीने सुगमरित्या कोकण रेल्वेशी जोडले गेले आहे. येथून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, मडगाव याकडे तसेच मंगळूर (मंगळूर मध्यरेल्वे आणि मंगळूर जंक्शन) एर्नाकूलम या दिशेन रेल्वेची सेवा कार्यरत आहे.
मडगाव ते कुमठा यातील अंतर हे रेल्वे प्रवासामुळे दोन तासांपेक्षा अधिक राहिले नाही.
कुमठा शहरात विमान वाहतूक सेवा उपलब्ध नाही. पण कुमठा शहराच्या उत्तरेला गोवा विमानतळ आणि दक्षिणेला मंगळूर विमानतळ काही अंतराने स्थित आहेत.
कुमठा शहर, पोफळीच्या बागा, काजूच्या बागा, नारळाच्या बागा आणि केळीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
कुमठा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामध्ये भातशेती घेतली जाते आणि प्रामुख्याने शेंगदाण्याचे पीक घेतले जाते.
अत्यल्प प्रमाणात अगरबत्ती, काजू आणि सुपारी यांच्या उत्पादनातही मोलाची भर आहे.
कुमठा येथे एस बी आय बँक, के दि सी सी बँक, कॅनरा बँक इत्यादी बँकांची सेवा उपलब्ध आहे.
मासेमारी हादेखील येथील लोकांचा एक व्यवसाय आहे. छोटया प्रमाणात येथे मासे निर्यात करणाऱ्या कंपन्या उदयास आल्या आहेत.
कुमठा शहर काही पुरातन मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. ते असे श्री. कुंभेश्वर, उप्पिना गणपती, शांतिका परमेश्वरी, शांतेरी कामाक्षी.
अशीच काही पर्यटनस्थळे कुमटा शहराजवळ स्थित आहेत. उत्तरेकडील अघानाशिनी नदी कुमटा येथे अरबी समुद्रात विलिन होते.
येथून जवळच असलेल्या ‘याना’ या ठिकाणास भव्य भरीव काळ्या पाषाणाच्या नैसर्गिक रचनात्मकतेला प्रसिद्ध शिव मंदिर यामुळे अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुप्रसिद्ध कानडी चित्रपट "नाम्मोरा मंदार हुवे " यातील ‘याना’ या स्थळाच्या विशेष चित्रीकरणामुळे स्थळ अधिकच प्रसिद्धीस आले.
हिंदूचे तीर्थस्थान असलेले गोकर्ण तीर्थक्षेत्र कुमठा शहराजवळ वसलेले आहे. यास दक्षिण काशी असेही ओळखले जाते. येथील किनारे ऊॅं किनारा, नंदनवन किनारा विशेष आकर्षण आहेत. ते साधारणतः कुमठा शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहेत. भारतातील जोम धबधबा ७० कि.मी. अंतरावर आहे.
मुर्देश्वर (६० कि.मी.), अप्सराकोंडा (३० कि.मी.), इडागुंजी (२५ कि.मी.).
असेच इतर लहानमोठ्या आकर्षक किनाऱ्यामुळे कुमठा शहराचे सौंदर्य खुलले आहे आणि पर्यटकांना मंत्रमुग्ध केले आहे.