ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी (नोव्हेंबर २२, इ.स. १९४०:मॉंटगोमरी, पंजाब - ) (महावीरचक्र-सन्मानित) हे भारतीय सैन्यातील एक निवृत्त अधिकारी आहेत. भारत पाकिस्तान मधील तिसऱ्या युद्धांतर्गत झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय नेतृत्वाबद्दल भारत सरकारने त्यांना महावीर चक्र प्रदान केले. या लढाईतील प्रसंगांवर आधारलेल्या जे.पी. दत्ता याच्या इ.स. १९९७ सालातल्या बॉर्डर चित्रपटातील सनी देओलाने वठवलेली भूमिका चांदपुरी यांच्या व्यक्तिरेखेवर बेतलेली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |