कृष्ण पहिला हा राष्ट्रकूटकालीन राजा होता. तो दंतिदुर्गाचा चुलता होता.
राष्ट्रकूट राजे (७५३-९८२) | |
दंतिदुर्ग | (७३५-७५६) |
कृष्ण पहिला | (७५६-७७४) |
गोविंद दुसरा | (७७४-७८०) |
ध्रुव धरावर्ष | (७८०-७९३) |
गोविंद राष्ट्रकूट तिसरा | (७९३-८१४) |
अमोघवर्ष | (८१४-८७८) |
कृष्ण राष्ट्रकूट तिसरा | (८७८-९१४) |
इंद्र राष्ट्रकूट तिसरा | (९१४-९२९) |
अमोघवर्ष दुसरा | (९२९-९३०) |
गोविंद राष्ट्रकूट चौथा | (९३०-९३६) |
अमोघवर्ष तिसरा | (९३६-९३९) |
कृष्ण राष्ट्रकूट तिसरा | (९३९-९६७) |
खोट्टिग अमोघवर्ष | (९६७-९७२) |
कर्क राष्ट्रकूट दुसरा | (९७२-९७३) |
इंद्र राष्ट्रकूट चौथा | (९७३-९८२) |
तैलप दुसरा (पश्चिम चालुक्य) |
(९७३-९९७) |
कृष्ण पहिला याचा जन्म इसवी सनाच्या सातव्या शतकात झाला. तो दंतिदुर्गाच्या मृत्यूनंतर इ.स. ७५८ मध्ये गादीवर बसला. कर्क पहिला हा कृष्ण पहिल्याचा पिता होय. कंन्नार, शुभतुंग, अकालवर्ष, वल्लभ व बल्लाह अशी त्याची टोपणनावे होती. कृष्णाचा मृत्यू इ.स. ७७३ साली झाला.
कृष्ण पहिला याने इ.स. ७६० मध्ये किर्तीवर्मन दुसरा याचा पराभव करून बदाामाच्य चालुक्य राजवंशाचा नाश केला. त्याने चारही दिशेला आपल्या राज्याचा विस्तार केला. म्हैसूर येथे गंग वंशाचा राजा राज्य करीत होता. त्याचे राज्य गंगवाडी या नावाने ओळखले जात असे. इ.स. ७६८ मध्ये कृष्णाने गंग राजा श्रीपुरुष याचा पराभव केला. कृष्णाने यांच्यानंतर राहप्पा या राजाचा पराभव केला. राहप्पाचा पराभव केल्यानंतर कृष्ण पाहिल्याने स्वतःला राजाधिराज आणि परमेश्वर या बिरुदावली धारण केल्या. कृष्णाने दक्षिण कोकण जिंकला आणि तेथे सनाफुल्ल यास आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. पुढे चालून हाच सनाफुल्ल कोकण मधील 'शिलाहार' घराण्याचा संस्थापक बनला.
कृष्ण पहिला हा महान राजा आणि कलेचा आश्रयदाता होता. वेरूळ येथील कैलास मंदिराचे काम कृष्णाने पूर्णत्वास नेले. इ.स. ७७३ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले.