केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ही माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत अंतर्गत असलेली संस्था आहे. ही संस्था सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ अंतर्गत[]जारी केलेल्या तरतुदींनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर नियंत्रण ठेवते. भारतातील चित्रपटांचे सार्वजनिक प्रदर्शन केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ने प्रमाणित केल्यानंतरच केले जाऊ शकते.

संस्थात्मक संरचना

[संपादन]

या मंडळात केंद्र सरकारने नियुक्त केलेले अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांचा समावेश असतो. मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे[]आणि मुंबई , कोलकाता , चेन्नई , बंगळूर , तिरुवनंतपुरम , हैदराबाद , नवी दिल्ली , कटक आणि गुवाहाटी असे ९ प्रादेशिक कार्यालये आहेत. प्रसून जोशी हे केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ विद्यमान अध्यक्ष आहेत. []

प्रमाणपत्रे आणि नियम

[संपादन]
Four yellow boxes with black letters: U, UA, A and S
चित्रपट-प्रमाणपत्र वर्गीकरण

चित्रपट सुरू होण्यापूर्वी किमान १० सेकंद तरी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ कोणत्याही चित्रपटाला चारपैकी एक प्रमाणपत्र देतं. चारही प्रकारांचे वेगळे अर्थ आहेत. या प्रमाणपत्रावर U, U/A, A, S या वर्गीकरण आढळतात.[]

U/अ प्रमाणपत्र

[संपादन]

म्हणजे अनिर्बंध अर्थात हा चित्रपट कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक पाहू शकतो.

U/A अव प्रमाणपत्र

[संपादन]

म्हणजे सावधगिरीने अप्रतिबंधित अर्थात १२ वर्षांच्या खालील मुले हा चित्रपट आपल्या पालकांसोबत पाहू शकतात.

A/व प्रमाणपत्र

[संपादन]

म्हणजे फक्त प्रौढ अर्थात हा चित्रपट केवळ १८ वर्षा वरील वयोगटातील प्रेक्षकच पाहू शकतात.

S प्रमाणपत्र

[संपादन]

म्हणजे विशेष वर्गांपुरते मर्यादित अर्थात केवळ खास प्रेक्षकच हा चित्रपट पाहू शकतात जसे की डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक इत्यादी.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "चलचित्र अधिनियम १९५२" (PDF). directorate.marathi.gov.in. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "महानायक अमिताभ यांच्या हस्ते सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन". लोकसत्ता. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "पहलाज गेले, प्रसून आले!". महाराष्ट्र टाइम्स. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "सेन्सॉर बोर्ड : ए टू झेड माहिती". एबीपी माझा. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]