केमिकल लूपिंग ज्वलन हा एक जागतिक तापमानवाढ रोखण्यास सुचवण्यात आलेला पर्याय आहे. हा वीजनिर्मितीसाठीच्या इंधनाच्या ज्वलनाचा पर्याय असून सध्या हा प्रायोगिक स्तरावर आहे. यात मुख्यत्वे इंधनाचे ज्वलन हे विविध प्रकारच्या धातूच्या ऑक्साईडने केले (Metal oxide) जाते. इंधनाच्या ज्वलनात धातूच्या ऑक्साईड मधील ऑक्सिजन इंधनाला दिला जातो व रूपांतर धातू मध्ये होते. या धातूला वेगळ्या रिऍक्टर मध्ये हवेने जाळून पुन्हा धातूचे ऑक्साईड बनवले जाते व पुन्हा इंधनाच्या ज्वलनासाठी तयार केले जाते.