कैकाडी ही भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश गुजरात तेलगणा केरळ मध्यप्रदेश झारखंड उत्तर प्रदेश एकूण १४ राज्यात आढळते एक भटकी विमुक्त जात आहे. ते मुळचे आंध्र प्रदेशचे /तामीळनाडूचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र यांत आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तेथे त्यांना कोरवा म्हणतात. मध्य महाराष्ट्रात जालना ,औरंगाबाद , बीड , येथे त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे, येथे दोन पोट जाती प्रामुख्याने आढळतात त्यात गावकैकाडी जे की शेतीसाठी / घरगुती कामासाठी लागणारे टोपल्या (डाल) धान्य साठवण्यासाठी कणींग इ. विणण्याचे काम करतात असत हा व्यवसाय आधुनिकीकरणाच्या काळात पूर्ण पणे बंद झाला असल्याने हे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. या पोट जातीत त्यांची नावे जाधव गायकवाड अशी आहेत. यांच्या मध्ये शिक्षणाचे प्रमाण हे चांगले आहे. त्या नंतर दुसरी पोट जात आहे धोंतले या मध्य त्यांची नावे आहेत पवार , जाधव, गायकवाड. माने यांचा व्यवसाय टोपली , ताटी, विनता होता,आता हळू हळू शैक्षणिक प्रगती होत असल्याने पूर्वीचे परंपरागत व्यवसाय सोडून हा समाज आता इतर व्यवसाय करत आहे.कश्यप, सातपाडी कवाडी मेंढरगुत्ती असे गोत्र आढळतात
गाव कैकाडी, कोरवी, कोंचीकोरवी, पामलोर, धोंतले, कैजी, माकडवाले, उर कैकाडी, वाईवसे या त्यांच्यात नऊ पोट जाती आहेत. यांपैकी महाराष्ट्रात गाव कैकाडी ऊर्फ कोरवा, पाल्मोर ऊर्फ धुंताळे व माकडवाले यांच्या तीन पोट जाती आढळतात. गावात राहून आपला पूर्वापार टोपली विणण्याचा धंदा करणाऱ्या कैकाड्यांना गाव कैकाडी म्हणतात. पाल्मोर गारूड्याप्रमाणे सापांचा खेळ करून उदरनिर्वाह करतात. कुंची कोरवा जातीचे लोक विक्रीसाठी कुंचले वा कुंची तयार करतात. १९६१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या सु. ५०,००० पर्यंत होती. त्यांच्या कुळींची नावे प्रामुख्याने जाधव, गायकवाड, पवार, माने, मधवंत, काळे,कत्राळे वगैरे आहेत. त्यांच्या भाषेला कैकाडी अथवा कुलू म्हणतात.
यांच्यात आते-मामे विवाह प्रचलित आहे. मावशीच्या मुलीबरोबर विवाह होऊ शकत नाही. बहुपत्नीकत्वाची प्रथा रूढ होती. वरपित्याने ५० ते १०० रु. वधूपित्यास द्यावे लागतात. वधूची मागणी वरपित्याकडून केली जात असे. विधवा-विवाह / पूनर्वीवाह होऊ शकतो. विधवेस दुसरा विवाह करताना पूर्वीच्या नवऱ्याकडील नातलगांस पहिल्या लग्नाचा खर्च द्यावा लागतो. बहुधा ही रक्कम तिचा दुसरा पती देतो.
कैकाडी हे हिंदू आहेत. त्यांच्या प्रमुख देवता तुळजाभवानी, खंडोबा, बहिरोबा, मरीआई, तुकाई, गणपती, यमाई या होत. तसेच त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबात जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, सोनारीचा बहिरोबा आणि मारुती यांची पूजा केली जाते. आळंदी, जेजुरी, सोनारी आणि पंढरपूर ही त्यांची तीर्थस्थाने होत.
मृताबाबत शोक पाच, नऊ, दहा अथवा बारा दिवस करतात. मृताला वाहून नेणाऱ्यास म्हणजे खांदे देणाऱ्यास ते पाच दिवस शिवत नाहीत. ते मृतास जाळतात. मृताबाबत टाक करून त्याची पूजा करतात. त्यांचा जादूटोणा, चेटूक, शकुन आणि अपशकून यांवर आता विश्वास नाही.
खानदेशातील कैकाड्यांमध्ये, मुल्हेरच्या दावल मलक या मुसलमान संताबद्दल आदर असून काही कुटुंबांत तर खंडोबाबरोबरच या साधूच्या हिरव्या काठीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांच्या प्रमुखाला ओकाम्या असे म्हणतात. कामाठी व कोल्हाट्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. जाती पंचायतीच्या वेळी ते त्यांना बोलावितात.