कॉलिन चार्ली ब्लाइथ (३० मे, १८७९:डेप्टफर्ड, केंट, इंग्लंड - ८ नोव्हेंबर, १९१७:बेल्जियम) हा इंग्लंडकडून एकोणीस कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा केंटकडून काउंटी क्रिकेट खेळला. हा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करायचा.[१][२]
ब्लाइथ १९०४मधील विस्डेन क्रिकेट खेळाडू्स अाल्मानॅक नियतकालिकातर्फे विस्डेन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार मिळविणाऱ्या पाच खेळाडूंपैकी एक होता. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जाणाऱ्या ब्लाइथने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये २,००० पेक्षा जास्त बळी घेतले. ही कामगिरी आत्तापर्यंत फक्त ३३ खेळाडूंनी केली आहे. हेडली व्हेरिटी आणि टॉम गॉडार्डसह ब्लाइथच्या नावावार प्रथम श्रेणी सामन्यांच्या एकाच दिवसात सर्वाधिक (१७) बळी घेण्याचा विक्रम आहे.
पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ब्लाइथ सैन्यात भरती झाला आणि पाशेन्डॅलच्या लढाईत मृत्यू पावला.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
|subscription=
ignored (सहाय्य)