कोची मेट्रो | |||
---|---|---|---|
मालकी हक्क | केरळ मेट्रो रेल लिमिटेड | ||
स्थान | कोची, केरळ | ||
वाहतूक प्रकार | जलद परिवहन | ||
मार्ग | १ | ||
मार्ग लांबी | २५.६ कि.मी. | ||
एकुण स्थानके | २२ | ||
दैनंदिन प्रवासी संख्या | ६५,००० | ||
सेवेस आरंभ | १७ जून २०१७ | ||
|
कोची मेट्रो ही भारताच्या कोची शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. २५.६ किमी लांबीच्या कोची मेट्रोच्या मार्गिकेवर एकूण २२ स्थानके असून भारतीय रेल्वेच्या एर्नाकुलम जंक्शन, एर्नाकुलम टाउन इत्यादी अनेक रेल्वे स्थानकांना कोची मेट्रो जोडते. तसेच केरळमधील जलमार्ग देखील ह्या मेट्रोद्वारे जोडले गेले आहेत.