कोडेक्स बर्बोनिकस हा एक अझ्टेक ग्रंथ असून तो अझ्टेक धर्मगुरूंकडून स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकण्यापूर्वी किंवा नंतर लिहिलेला असावा. फ्रांसमधल्या पाले बुर्बोनच्या नावावरून ह्या ग्रंथाचे नामकरण करण्यात आले. २००४मध्ये मार्टिन यान्सन आणि गाबीना औरॉरा पेरेझ हिमेनेझ ह्यांनी कल्पना मांडली की चिवाकोआट्ल ह्या देवीवरून ह्या ग्रंथाचे मूळ नाव कोडेक्स चिवाकोआट्ल असावे.[१]
कोडेक्स बर्बोनिकस हा ग्रंथ अमाट्ल "कागद"चा एक तावच आहे. मूळात हा ताव ४० अकोर्डियनप्रमाणे (एक वाद्य) घड्या घातलेला असून पहिली दोन आणि शेवटची दोन पाने हरविलेली आहेत. आता हा ग्रंथ ४६.५ फ़ूट लांबीचा आहे. प्री-कोलंबियन संस्कृतीप्रमाणेच हाही ग्रंथ चित्रमय प्रकारात मोडणारा असून, त्यातील काही स्पॅनिश लेखन मागाहून घालण्यात आले.
कोडेक्स बर्बोनिकसचे तीन भाग आहेत:
पहिला भाग खूप गुंतागुंतीचा असून तो भविष्य, शुभशकून वर्तविणारी दिनदर्शिका (किंवा टोनालामाट्ल) आहे. प्रत्येक पाने २६०-दिवसांचे वर्ष (किंवा टोनाल्पोवाली), मधील २० त्रेचेनांपैकी (किंवा १३-दिवसांचा काळ), एक दर्शविते. बरीच पाने देव किंवा देवदेवतांच्या चित्राने भरलेली असून उरलेल्या भागात १३ दिवसांचे चिन्ह असलेले ट्रेक्ना आणि १३ इतर देवदेवतांची चित्रे आहेत.
ह्या २६ चिन्हांच्या साहाय्याने धर्मगुरूंस जन्मकुंडली आणि येणाऱ्या दिवसांतील शुभशकून वर्तविता येई. ह्या ग्रंथाची पहिली (मूळ २० पानांपैकी वाचलेली) १८ पाने शेवटच्या भागापेक्षा बरीचशी झिजलेली असून ते हा पहिला भाग वारंवार वापरला गेल्याचे दर्शविते.
ग्रंथाच्या दुसऱ्या भागातील कागदपत्रांत मेसोअमेरिकन ५२ वर्षचक्र, ह्या ५२ सौर वर्षातील पहिल्या दिवसांपासूनच्या तारखा क्रमवार दर्शविल्या आहेत. हे दिवस रात्रीचे नऊ देव ह्यांच्याची परस्परसंबंधित आहे.
तिसरा विभागात सण-उत्सव आणि धार्मिक विधी संदर्भात असून त्यात ५२-वर्ष चक्रानंतर जी नवीन आग पेटवायलाच हवी, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा विभाग अपूर्ण आहे.
कोडेक्स बर्बोनिकस - Codex Borbonicus
पाले बुर्बोन - Palais Bourbon
मार्टिन यान्सन - Maarten Jansen
गाबीना औरॉरा पेरेझ हिमेनेझ- Gabina Aurora Pérez Jiménez
चिवाकोआट्ल - Cihuacoatl
कोडेक्स चिवाकोआट्ल - Codex Cihuacoatl
अमाट्ल - Amatl
अकोर्डियन - Accordion
प्री-कोलंबियन - pre-Columbian
टोनालामाट्ल - Tonalamatl
टोनाल्पोवाली - Tonalpohualli
त्रेचेना - Trecena
५२ वर्षचक्र - 52 year cycle
नवीन आग - New Fire