कोळी समाज

वीरांगना झलकारी बाई कोळी, 1857 की महानायिका
कोळी
कोळियांची जव्हार संस्थानचा ध्वज
लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश
महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, जम्मू काश्मीर, नेपाळ
भाषा
मराठी भाषा, हिंदी भाषा, गुजराती भाषा
धर्म
हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म

कोळी समाज (Koli Caste) हा मानवी समाज आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात Karnataka किनारपट्यांवर यांची वस्ती आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.[]

कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन काळात संपूर्ण भारतात ह्या जातीचे वर्चस्व होते.

भौगोलिक स्थाने

[संपादन]

कोळी हा समाज संपूर्ण भारतात पूर्वीपासून समुद्र किनाऱ्यावर तसेच काही ठिकाणी तलाव, नद्या ह्या ठिकाणी नांदत आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आद्य रहिवाशी आहेत. मुंबई ही १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट (लहान कुलाबा), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनवली गेली आहे. त्यानंतर ह्या सर्व बेटांना एकत्र भरण्या भरून (खाडी) बुजवून मुंबई एकत्र करण्यात आली. तसेच चेंबूर मध्ये माहूल, गव्हाणपाडा, बोरलागाव, आधारवाडी (अगरवाडी), असल्फा, ट्राँबे इतर लहान सहान

  • भारतात-

महाराष्ट्राच्या बाहेर भारतभरात हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच भारताबाहेर पाकिस्तान येथेही या जमातीचे समाज आढळतात.[]

कोळीवाडा

[संपादन]
चित्र:उत्तन कोळीवाड्यातील काम करणाऱ्या महिला.jpg
उत्तन कोळीवाड्यातील काम करणाऱ्या महिला

मच्छिमार कोळी समाज प्रामुख्याने मासेमारी करीत असल्याने समुद्र किना-यावर त्यांची वस्ती असते. कोळ्यांच्या या वस्तीला कोळीवाडा असे म्हणले जाते. []मुंबई आणि जवळच्या उपनगरात असे कोळीवाडे दिसून येतात.मुंबईत माहीम, शिव (सायन, मुंबई), धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, गिरगाव, खार, चिंबई, गोराई,मालाड, बंदरपाखाडी, [[मढ किल्ला ,माहूल,ट्रांबे,बोरला गाव,चेंबूर |येथे कोळीवाडे आहेत.[]

जाती व जमात

[संपादन]

महाराष्ट्रातील कोळी समाजात सुद्धा निरनिराळे जाती व जमात आहेत, जसे कोळी महादेव , कोळी मल्हार, टोकरे कोळी, डोंगर कोळी या जमाती आहेत .भोई कोळी, वैती कोळी, सोनकोळी, ख्रिश्चन कोळी,मांगेला कोळी,  मच्चीमार  कोळी , सूर्यवंशी कोळी इत्यादी जाती .

कोळी महादेव -

[संपादन]

[कोळी महादेव १]हैद्राबाद राज्य आणि बिदर यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगराच्या रांगा (Mahadev Hills) आहेत. महादेव कोळी जमात प्राचीन काळी या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हणले जाते. तेथून ते बालेघाटाच्या रांगा ओलांडून महाराष्ट्रात आले. मध्य भारतातील कोल वंशाच्या जमातीशी त्यांचे बरेच साम्य असल्यामुळे त्यांना कोलवंशी असे म्हणतात

धार्मिक श्रद्धा

[संपादन]

हा समाज देवांवर जास्त विश्वास ठेवतो, त्यांची देवी श्री एकवीरा देवी (कार्ला डोंगर) लोणावळा आणि खंडोबा (जेजुरी) ,खंडोबा मैलार  ,वरसुबाई , तुळजा भवानी येथे दरवर्षी भेट देतात आणि नवस बोलून तो फेडतात. तसेच दर वर्षी नारळी पौर्णिमेचा दिवस सरल्यानंतर होडी, बोटीची पूजा करून ते समुद्रात व्यवसायासाठी उतरवतात. ह्या समाजामध्ये मुख्यतः वेताळ देव आणि कुर्स देव एका निर्जीव दगडामध्ये देवत्व जातात. तसेच मुंबईतील माहीम येथील रहिवाशी वांद्रे येथील श्री कडेश्वरी देवी हिला बारेकरणी आई म्हणून संबोधतात, बारेकरणीचा अर्थ बारा - कोसावर म्हणजेच दूर असलेली देवी. आणि दरवर्षी दस ऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिला मान - पान देतात. ह्या समाजात लग्न उत्सवही फार आनंदात साजरी करतात. हा समाज भारतात " इतर मागास प्रवर्ग " मध्ये मोडतो. आणि महाराष्ट्रात " विशेष मागास प्रवर्ग " आणि काही (5) अनुसूसूचित जमाती म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारकडून ह्या लोकांना सरकारी योजनेत २% अनुदान आहेत, आणि जाती त्याहून कैक पटीने आहेत.

व्यवसाय

[संपादन]
उत्तन कोळीवाडा येथील कोळी काम करताना
उत्तन कोळीवाड्यातील विक्रीसाठीचे मासे

कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय समुद्रातून जाळ्याच्या साहाय्याने मासळी पकडणे आणि ती बाजारात विकण्यासाठी घेऊन जाणे. हा व्यवसाय इतका जुना आहे त्याहून अधिक जोखमी आहे. परंतु त्यातही जिवाचीही पर्वा न करता ते मासेमारी साठी खोल समुद्रात जातात. ह्या मासेमारीत त्यांना जाळ्यात लहान मासळीपासून ते मोठ्या मासळी मिळतात, मग ते निवडून बाजाराला पाठवले जाते.ती लोक मासळीला " म्हावरा " म्हणतात, ह्या म्हावर्यात काही लहान मासळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसे- काटी, वाकटी, बला, राजा - राणी, जीपटी, चोर बोंबील, चप्पल मासे, शीवांड, जिताडा, मोडि, निवटी, कर्ली, तारली, ढोमा, कोलीम ( सर्वात लहान जवळा ), बोंय म्हावरा, सल्फा, नारशिंगाला, खाडीतली कोळंबी, बिलजा, तेंडली,शिवल्या ( शिंपल्या ), कालवे इ. वर्षाचे ८ महिने म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून ते शिमगा (होळी) पर्यंत त्यांची मासेमारी चालते आणि होळीनंतर बोट्या किंवा होड्या किनाऱ्यावर चढवून नारळी पौर्णिमेची वाट बघतात ४ महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात ते सुकवलेल्या मासळीवर किंवा खाडीतील लहान - सहान मासे पकडून आपली गुजराण करतात, कारण पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप त्यांना मासेमारीसाठी धोकादायक असते. त्यांनंतर नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. त्यांचे असे मत आहे कि, तो नारळ अर्पण करून समुद्र देव शांत होतो, आणि मग बोट किंवा होडीची पुजा करून ते दर्यात उतरवून मासेमारीला सुरुवात करतात.काही कोळी लोकांचे होडी किंवा बोटी नाहीत अशा स्त्रिया पहाटे ४ वाजता उठून मुंबईतील भाऊंचा धक्का (बॅलार्ड पिअर) किंवा क्रॉफर्ड मार्केट येथून मासळी विकत घेऊन बाजारात तर काही स्त्रिया घरोघरी जाऊन विकतात.

हे लोक समुद्रावर पोटासाठी अवलंबून असल्याकारणाने समुद्रालाही देव मानतात आणि नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राला वाजतगाजत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करतात आणि घरोघरी नारळाचे गोड नैवेद्य करतात जसे नारळीभात, नारळवडी, करंज्या.त्यांच्या मते, हा नारळ अर्पण करून समुद्र शांत होतो, त्याचबरोबर समुद्र आपल्याला त्याच्यातील साधन संपत्ती देतो, त्यामुळे हा त्याचा मान.[] शिमगा, होळी ह्या सणात ह्या समाजात पंधरा दिवस आधी चालू होतो.होळी हा सण कोळीवाड्यात फार आवडीने साजरी करतात.

पोशाख

[संपादन]

कोळी लोकांचे पारंपरिक परिधान करावयाचे पोशाख स्त्रियांसाठी लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल (मोठे) आणि शर्ट त्याबरोबर कान टोपेरा ( कान आणि डोके झाकणारी टोपी ) असे असते.कोळी स्त्रियांना दागदागिन्यांची फार आवड असते. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यात ते नटून - थटून शुंगार करतात.[]आधुनिक काळात आधुनिक पोशाख वापरण्याकडे या समाजाचा कल दिसतो.

रोजचे आहार

[संपादन]

कोळी लोकांचे मुख्यतः रोजचे जेवण म्हणजे भात आणि मासे. तसेच भाज्यांना सुद्धा ह्यांच्या आहारात फार महत्त्व आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या गोड-धोड मधेही तसा फारच फरक पडत नाही.

कोळीनृत्य

[संपादन]

कोळी समाजातील महाराष्ट्रामध्ये कोळीनृत्य प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी वाळूवर हे नृत्य सादर केले जाते.[]

  • काही वैशिष्ट्यपूर्ण कोळीगीते-

१. मी हाय कोळी,     २. एकविरा आई तू डोंगरावरी,

३. वेसावची पारू नेसली गो, 

४. हीच काय ती सोनटिकली, 

५. नवरीच्या मांडवान नवरा आयलाय, 

६. चिकना चिकना म्हावरा माझा,  

७. सण आयलाय गो नारळी पुनवेचे, 

८. नाताळचे रिटा सणाला,

९. हे पावलाय देव माना मल्हारी,

१०. पोरी सांगताय गो,

११. ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का,

१२. येरा केलास माना पागल केलास,

१३. डोंगराचे आरून इक बाय चांद उंगवला,

१४. बेगीन चल गो चंद्रा, होरी आयलीय बंदरा,

१५. आज कोळीवाऱ्यानं धनुच्या दारान,

१६. वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव,

१७. शिंगाला नवरा झायलाय गो कोलबी नवरी झायली ग बाय,

१८. या गो दांड्यावरण बोलतय नवरा कोणाचा येतो,

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Danver, Steven L. (2015-03-10). Native Peoples of the World: An Encylopedia of Groups, Cultures and Contemporary Issues: An Encylopedia of Groups, Cultures and Contemporary Issues (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-317-46400-6.
  2. ^ a b Danver, Steven L. (2015-03-10). Native Peoples of the World: An Encylopedia of Groups, Cultures and Contemporary Issues: An Encylopedia of Groups, Cultures and Contemporary Issues (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-317-46400-6.
  3. ^ a b Desai, Dev (2020-05-13). In the pursuit of a Better Way (Part 1): Ubiquitous and identical Urban Morphology (इंग्रजी भाषेत). Dev Desai.
  4. ^ Punekar, Vinaja B. (1959). The Son Kolis of Bombay (इंग्रजी भाषेत). Popular Book Depot.
  5. ^ Desai, Dr Chetana. SOCIOLOGY OF DANCE: A CASE STUDY OF KATHAK DANCE IN PUNE CITY (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 978-0-359-85967-2.


चुका उधृत करा: "कोळी महादेव" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="कोळी महादेव"/> खूण मिळाली नाही.