2006 film directed by Dibakar Banerjee | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
खोसला का घोसला हा २००६ मधील दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील विनोदी नाट्य चित्रपट आहे. हा बॅनर्जींचा दिग्दर्शनात पदार्पण चित्रपट होता. याची निर्मिती तांडव फिल्म्स लेबल अंतर्गत सविता राज हिरेमठ आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्सच्या तर्फे रॉनी स्क्रूवाला यांनी केली होती. जयदीप साहनी लिखित या चित्रपटात अनुपम खेर, बोमन इराणी, परविन डबास, विनय पाठक, रणवीर शोरी आणि तारा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा कमल किशोर खोसला (खेर) या एक मध्यमवर्गीय दिल्लीवासी आणि त्याच्या कुटुंबाने त्यांची जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे जी खुराणा (इराणी) या बिल्डरने ताब्यात घेतली आहे.[१][२]
खोसला का घोसला हा २००६ मधील कारा फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि २२ सप्टेंबर २००६ रोजी तो प्रदर्शित झाला. ५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये याला हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[३] हा ₹३७.५ दशलक्षच्या उत्पादन बजेटवर तयार केला व चित्रपटाने एकूण ₹६६.७ दशलक्षकमावले व व्यावसायिक यश मिळवून दिले.[४] नंतर २००८ मध्ये तामिळमध्ये पोई सोल्ला पोरोम आणि कन्नडमध्ये २०१० मध्ये रामे गौडा विरुद्ध कृष्णा रेड्डी म्हणून हा पुनर्निर्मित करण्यात आला.[५]