गंगामूळ हे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे गाव आहे. याच नावाच्या टेकडीजवळ वसलेले हे गाव पंडिता रमाबाई तथा रमा बिपिन मेधावी यांचे जन्मस्थान आहे.
हा प्रदेश चिक्कमगळूर जिल्ह्यात आहे. गंगामूळ जवळील टेकड्यांमधून तीन मोठ्या नद्यांचा उगम होतो. तुंगा नदी येथून नैऋत्येस वाहते तर भद्रा नदी पूर्वेकडे वाहत शिवमोग्गाजवळ तुंगा नदीस मिळते व तुंगभद्रा नदीमध्ये परिवर्तित होते. नेत्रावती नदी पश्चिमेस वाहत अरबी समुद्रास मिळते.
या प्रदेशात लोखंडाच्या खाणी आहेत.