गडचिरोली

हा लेख गडचिरोली शहराविषयी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?गडचिरोली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२०° १०′ ००″ N, ८०° ००′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४७० मी
जिल्हा गडचिरोली
लोकसंख्या ४२,४६४ (2011)
खासदार मारोतराव कोवासे
कोड
पिन कोड

• 442603

गडचिरोली हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गडचिरोलीची लोकसंख्या ४२,४६४ आहे. हे शहर वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे.हा जिल्हा माओवादी कारवायांनी त्रस्त आहे.

गडचिरोली जिल्हात अनेक प्रेक्षणीय स्थळे आढळून येतात. उदा.- चपराळा वन्यजीव अभयारण्य, वडधम जीवाश्म

जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्ये

[संपादन]

नधाम" या नावानेही ओळखले जाते. हा परिसर आलापल्ली वन विभागात येतो. येथे वनखात्याच्या मार्फत विकास करण्यात येत आहे.

मोर्शी जिल्हा गडचिरोली

चपराळा वन्यजीव अभयारण्य स्थापना : २५ फेब्रुवारी १९८६ क्षेत्रफळ : १३७.७८ चौकिमी

  • जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ८० कि.मी. व आष्टीपासून १० कि.मी. अंतरावर चपराळा अभयारण्य आहे

वनविभाग : आलापल्ली वनविभागाच्या देखरेखीसाठी निरीक्षण कुटी तयार करण्यात आले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे व वनाचे संरक्षण करण्यात मदत होत आहे. या ●ण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने सन १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले.

पक्षी: वाघ, बिबट्या, रानडुक्कर, निलगाय, सांबर, चित्ता, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणी आढळतात, शिवाय ातीचे पक्षी देखील दिसून येतात.

■ घनदाट हिरवेगर्द वनराईत आढळणारे चंदनाचे वृक्ष तसेच पानझडी वन प्रकारातील हे अभयारण्य आहे.


विस्तार

[संपादन]

चपराळा अभयारण्य, प्राणहिता नदीच्या उत्तर किनाऱ्यावर उत्तर अक्षांश १९०३१ ४० ते १९०४२ २५" आणि पूर्व रेखांश ७९४७५२ ते ७९५६ ४३" दरम्यान वसलेले आहे.

  • महाराष्ट्र शासनाने अधिसुचना क्रमांक WLP/1085/CR-75/A-5 दिनांक २५ फेब्रुवारी १९८६ अन्वये अभयारण्य म्हणून स्थापित केले आहे.
  • चपराळा अभयारण्याचे एकूण क्षेत्र १३७.७८ चौ.कि.मी. आहे.

चपराळा अभयारण्याच्या सभोवती छत्तीसगड राज्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान, भामरागड वन्यजीव अभयारण्य व प्राणहिता अभयारण्य आहे.

  1. दर अभयारण्य शुभ्रपाठी गिधाड, सारस, ग्रिन मुनिया आणि पेंटेड स्टॉर्क यासारख्या असुरक्षित वन्यपक्षांचे आश्रयस्थान आहे.

संदर्भ

[संपादन]

जिल्ह्याची इतिहास :

तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा निर्मिती करण्यात आली. गडचिरोली जिल्हा हा १९८२ पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता. मुख्यतः गडचिरोली व सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होते.

प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्रकुटांचे राज्य होते. त्यांनीच जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडा मंदिर बांधले. त्यानंतर चालुक्य व देवगीरीचे - यादव यांचे साम्राज्य होते. देवगीरीचे यादव आणि वरंगलचे काकातीया राजे यांचा अल्लाउद्दीन खिलजी यांच्याकडून पराभव झाल्यानंतर चंद्रपूरच्या गॉड राजांनी याप्रदेशात आपले वर्चस्व निर्माण केले.

इ.स. १३ व्या शतकात खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूर जिल्ह्याची स्थापना केली. आणि त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्यांच्या (भोसल्यांच्या) सत्तेखाली आला. सन १८५३ मध्ये चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) हा बेरार प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. सन १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.

सन १८७४ पर्यंत जिल्ह्यात मुल, वरोरा व ब्रम्हपूरी ह्या तीन तहसील होत्या. त्यानंतर मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात येऊन त्यातून सिरोंचा, अलबिका, नुबूर व चेर्ला हे चार तहसिल चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्यात आले व या तहसिलांचे मुख्यालय सिरोंचा येथे ठेवण्यात आले. ब्रिटिशांनी सन १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्रम्हपुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापुर्वी हा भाग सन १९५६ पर्यंत केंद्र शासनाच्या खाली होता. त्यानंतर पुनर्रचनेनुसार चंद्रपूर हा तत्कालीन बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १ मे १९६० रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हा जिल्हा म्हणून समाविष्ट केला. २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हा

हा भारताचा ५५६ वा जिल्हा तसेच महाराष्ट्राचा ३० वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.