गीता अय्यंगार ( ७ डिसेंबर,१९४४पुणे - १६ डिसेंबर २०१८, पुणे) या भारतीय योगशिक्षिका होत्या. या योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांची मोठी मुलगी होत्या. त्यांनी स्त्री स्वास्थ्यासाठी योगासनांचा पुरस्कार केला.[१]
अय्यंगारांनी त्यांच्या वडिलांकडून अगदी लहानपणीच योग शिकण्यास सुरुवात केली. १९६१ साली महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर, वडील इतर देशांच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी वडिलांच्या जागी शिकविण्यास सुरुवात केली. १९८४ साली त्यांच्या वडिलांनी या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर[२], त्यांनी त्यांचे बंधू प्रशांत अय्यंगार (जन्म: १९४९) यांच्यासोबत रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग संस्थेचे (आर.आय.एम.वाय.आय.) काम बघण्यास सुरुवात केली.[३] यासोबतच त्यांचे परदेशात योगाच्या प्रसाराचे काम चालूच होते.
स्त्रियांच्या विविध गरजा डोळ्यासमोर ठेवून अय्यंगारांनी योगाचा अभ्यास केला. स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी, जसे की मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती नंतर आणि रजोनिवृत्ती झाल्यावर करावयाची विशिष्ट आसने, प्राणायाम आणि त्यांचा योग्य क्रम त्यांनी दिला. आपल्या वडिलांप्रमाणेच अय्यंगार मन आणि शरीर यांचा योग कसा साधायचा आणि श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, स्नायू, अधिचर्म आणि मनाला सक्षम कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात.
अयंगार संस्थेत काम करण्याबरोबरच, त्यांनी विदेशातही अयंगार योग प्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी प्रसाराचे काम केलेले मुख्य प्रदेश पुढील प्रमाणे आहेत.