गोरेगाव हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. जोगेश्वरीच्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे.
गोरेगांव रेल्वे स्थानक हे गोरेगांवमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेट व बोरिवली जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगावच्या पूर्वेकडून धावतो. बेस्टचे अनेक मार्ग गोरेगावमध्ये कार्यरत आहेत. येथून गोरेगांव लोकल सुटतात.