ग्लोबल टीचर प्राइज | |
---|---|
देश | संयुक्त अरब अमिराती |
प्रदानकर्ता | वार्की फाउंडेशन |
Reward(s) | $1 दशलक्ष (१० लाख अमेरिकन डॉलर किंवा ७ कोटी+ भारतीय रुपये) |
प्रथम पुरस्कार | २०१५ |
संकेतस्थळ |
www |
ग्लोबल टीचर प्राइज (वैश्विक शिक्षक पुरस्कार) हा वर्की फाऊंडेशनद्वारे $1 दशलक्ष (७ कोटी पेक्षा अधिक) रकमेचा दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा शिक्षकास दिला जातो ज्याने शिक्षणात उल्लेखनीय योगदान दिले आहे.[१][२] विशिष्ट निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांची नावे जगभरातील लोकांसाठी खुली आहेत आणि शिक्षकदेखील त्यांची नामांकने देऊ शकतात.[३] हे ग्लोबल टीचर प्राइस अॅकॅडमीद्वारे दिले जाते, ज्यात प्रमुख शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, समालोचक, पत्रकार, सार्वजनिक अधिकारी, तंत्रज्ञान उद्योजक, कंपनी संचालक आणि जगभरातील शास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.[४] या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे.
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.[५] हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे.[६][७] या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.[८][९][१०]
वर्ष | देश | नाव | व्यवसाय | संदर्भ |
---|---|---|---|---|
२०१५ | मेन ,दुवा=|सीमा अमेरिका | नॅन्सी अटवेल | इंग्रजी शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षक | |
२०१६ | रामल्ला, वेस्ट बँक ,दुवा=|सीमा पॅलेस्टाईन | हानान अल हरब | पॅलेस्टिनी शिक्षक | [११] |
2017 | सॅलिट, क्यूबेक,दुवा=|सीमा कॅनडा | मॅगी मॅकडोननेल | Inuit शिक्षक | [१२] |
2018 | ब्रेंट, वायव्य लंडन ,दुवा=|सीमा इंग्लंड | एंड्रिया झाफिराकाऊ | कला व वस्त्रोद्योग शिक्षक | [१३] [१४] [१५] [१६] |
2019 | नकुरु ,दुवा=|सीमा केन्या | पीटर टाबीची | विज्ञान शिक्षक | [१७] |
2020 | महाराष्ट्र ,दुवा=|सीमा भारत | रणजितसिंह डिसले | [१८] |