2003 film by Anant Balani, Sudhir Mishra | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | prostitution | ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता | |||
Performer |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
चमेली हा २००४ चा भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे.[१] यात करीना कपूर आणि राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता. नवनीत राणा आणि राजीव कनकला यांच्या प्रमुख भूमिकेत या चित्रपटाचा तेलगूमध्ये जबिलम्मा (२००८) म्हणून पुनर्निर्मित करण्यात आला. चित्रपटांमधुन निवृत्ती घेण्यापूर्वीचा हा रिंकी खन्नाचा शेवटचा चित्रपट आहे.
चमेलीला सर्वप्रथम अभिनेत्री अमिषा पटेलला ऑफर करण्यात आली होती, जिने नंतर चित्रपट करण्यास नकार दिला आणि सांगितले की वेश्येची भूमिका तिच्या पात्राशी जुळत नाही.[२] त्यानंतर ही भूमिका करीना कपूरकडे गेली, ज्याने तिच्या कारकिर्दीला कलाटणी दिली.[३] चित्रपटाची निर्मिती ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत बालानी यांचे २८ ऑगस्ट २००३ रोजी निधन झाले.[४] प्रितीश नंदी यांनी सुधीर मिश्राला चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी बोलावले तेव्हा हा चित्रपट जवळपास रखडला होता. मिश्राने वेगळ्या पटकथेसह चित्रपट पूर्ण केला आणि ९ जानेवारी २००४ ला प्रकाशित झाला.[५]
संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांचे बोल इर्शाद कामिल आणि प्राध्यापक आर.एन. दुबे यांनी लिहिले आहेत.[६]
गाणे | गायक | नोट्स | कालावधी |
---|---|---|---|
"भागे रे मन" | सुनिधी चौहान | करीना कपूर आणि राहुल बोस यांच्यावर चित्रित | ५:३३ |
"सजना वे सजना" | सुनिधी चौहान | महेक चहल आणि करीना कपूर यांच्यावर चित्रित | ३:५७ |
"सजना वे सजना २" | सुनिधी चौहान | ३:५७ | |
"जाने क्यों हमको" - स्त्री | सुनिधी चौहान | ४:२३ | |
"जाने क्यों हमको" - युगल (आवृत्ती १) | सुनिधी चौहान आणि जावेद अली | ४:३३ | |
"जाने क्यों हमको" - युगल (आवृत्ती २) | सुनिधी चौहान आणि उदित नारायण | ४:३३ | |
"ये लम्हा" | सुनिधी चौहान | चित्रांगदा सिंग आणि राहुल बोस यांच्यावर चित्रित | ४:०८ |
"सोल ऑफ चमेली" | (वाद्य) | ४:०९ |