चिंचवड | |
जिल्हा | पुणे |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | १०,०६,४१७ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२० |
टपाल संकेतांक | ४११-०३३ |
वाहन संकेतांक | MH-१४ |
निर्वाचित प्रमुख | सौ.माई ढोरे (महापौर) |
प्रशासकीय प्रमुख | राजेश पाटिल(भाप्रसे) (आयुक्त) |
संकेतस्थळ | http://www.pcmcindia.in |
चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाखाली येते.
चिंचवड ह्या गावाचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तऐवजांत येतो. पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या संतांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चापेकर बंधूचे जन्मस्थळ आहे.