चित्रा देव | |
---|---|
जन्म |
२४ नोव्हेंबर, १९४३ पूर्णिया |
मृत्यू |
२ ऑक्टोबर २०१७ (वय ७४) कोलकाता, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखिका |
प्रसिद्ध साहित्यकृती | ठाकूरबारीर अंदरमहाल |
पती | अविवाहित |
पुरस्कार | चित्तरंजन बंदोपाध्याय जन्मशताब्दी पुरस्कार |
चित्रा देव (२४ नोव्हेंबर १९४३ - २ ऑक्टोबर २०१७) या बंगाली कादंबरीकार आणि संपादिका होत्या.
चित्रा देव यांचा जन्म १९४३ मध्ये ब्रिटिश भारतातील पूर्णिया येथे झाला. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एमए आणि पीएचडी बंगाली साहित्यात पूर्ण केली.[१]
श्रीमती. चित्रा देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात आनंदबाजार पत्रिकामधून केली. १९८० ते २००४ पर्यंत त्यांनी तिथे काम केले. त्या एबीपीच्या ग्रंथालय विभागाच्या प्रभारी होत्या. चित्रा देव यांनी अनेक पुस्तके संपादित आणि अनुवादित केली आहेत. त्यांनी मुलांसाठी काही ऐतिहासिक कादंबऱ्याही संपादित केल्या आहेत. त्यांनी बंगालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात स्त्रियांच्या योगदानावर संशोधन आणि विपुल लेखन केले आहे. टागोर घराण्याच्या महिलांशी संबंधित देव यांचे सर्वात लोकप्रिय काम आहे.[२] त्यांचे ठाकुरबरीर अंदरमहल हे पुस्तक १९८० मध्ये प्रकाशित झाले होते जे बांगला अकादमीने पुरस्कृत केले होते आणि नंतर अनेक भाषांमध्ये अनुवादित केले होते.[३] त्यांना बंगिया साहित्य परिषदेचा 'चित्तरंजन बंदोपाध्याय जन्मशताब्दी पुरस्कार'ही मिळाला होता. त्यांच्या पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे:
चित्रा देव यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस या आजाराने ग्रासले होते. २ ऑक्टोबर २०१७ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.[४]