चिन्मय मांडलेकर | |
---|---|
![]() चिन्मय मांडलेकर | |
जन्म |
चिन्मय मांडलेकर २ फेब्रुवारी, १९७९ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय ,कथा-पटकथालेखक आणि दिग्दर्शक |
भाषा | मराठी |
पत्नी |
नेहा जोशी मांडलेकर (ल. २०११) |
चिन्मय मांडलेकर (जन्म : २ फेब्रुवारी, इ.स. १९७९) हा मराठी अभिनेता आहे. चिन्मय अभिनयाखेरीज कथा-पटकथा लेखन आणि नाट्यदिग्दर्शनसुद्धा करत असतो.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पदवीधर, मांडलेकर यांनी बेचकी आणि सुखांशी भांडतो आमी सारख्या यशस्वी नाटकांचे लेखन, दिग्दर्शन किंवा अभिनय केला आहे.
चित्रपटांमध्ये, मांडलेकर एक अभिनेता आणि लेखक म्हणून सक्रिय आहेत, त्यांनी झेंडा, मोरया किंवा गजर: जर्नी ऑफ द सोल सारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. छोट्या पडद्यावर, तू तीथे मी या हिट टीव्ही मालिकेत मृणाल दुसानिसच्या विरुद्धच्या भूमिकेने त्याला महाराष्ट्रातील घराघरात ओळखले. २०१७ मध्ये, तो शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि अमोल कागणे निर्मित, हलाल या मराठी चित्रपटाचा भाग होता.
मांडलेकर यांनी तेरे बिन लादेन आणि शांघाय यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही सहाय्यक भूमिका केल्या आहेत. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आणि एक मुलगा अशी २ मुले आहेत. २०१७ मध्ये, चिमय मांडलेकर कलर्स मराठीवरील मराठी टीव्ही मालिका सख्या रेचा एक भाग होता. तू माझा सांगती या मराठी मालिकेत त्यांनी संत तुकारामांची मुख्य भूमिका साकारली होती. २०२०-२०२१ पासून, त्याने कलर्स मराठीवर प्रसारित होणारी चंद्र आहे साक्षीला मराठी मालिका लिहिली आणि निर्मिती केली. सप्टेंबर २०२१ पासून, त्याने त्याच्या मूलाक्षर प्रॉडक्शन अंतर्गत सोनी मराठीसाठी ज्ञानेश्वर माऊली लिहिले आणि तयार केले.