जंजिरा संस्थान

जंजिरा संस्थानाचा ध्वज
जंजिरा किल्ला

जंजिरा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील कुलाबा एजन्सीतील एक संस्थान होते. काठियावाड मधील जाफराबाद हा देखील याच संस्थानाचा एक भाग आहे. संस्थानाचे आठ महाल आहेत.

राजधानी

[संपादन]

या संस्थानाची राजधानी जंजिरा येथे आहे. जंजिरा हे नाव मूळ अरबी शब्द जझीराड म्हणजे बेट या शब्दाचा अपभ्रंश आहे.

क्षेत्रफळ

[संपादन]

जंजिरा संस्थानाचे क्षेत्रफळ ८३९ चौरस किमी इतके होते.

संस्थानिक

[संपादन]

या संस्थानाचे संस्थानिक सिद्दी वंशाचे होते. ते सुन्नी पंथाचे मुसलमान होते. येथील संस्थानिक नवाब ही पदवी लावत असत.

स्वातंत्र्योत्तर कालखंड

[संपादन]

भारत स्वतंत्र झाल्यावर जंजिराच्या नवाबाने हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. हे संस्थान सध्याच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे.