जगमोहन

जगमोहन मल्होत्रा (सप्टेंबर २५, इ.स. १९२७ - मे ३, २०२१ ) हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी १९८४ ते १९८९ आणि जानेवारी १९, १९९० ते मे २६, १९९० या काळात जम्मू काश्मीर राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला. तसेच १९९६, १९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.