जमशेदजी फ्रामजी मदन

जमशेटजी फ्रामजी तथा जे.एफ. मादन (१८५६१९२३) हे भारतीय चित्रपटव्यवसायाच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी एल‌फिन्स्टन बायोस्कोप कंपनीची स्थापना करून अनेक चित्रपटांचे निर्माण केले तसेच एल‌फिन्स्टन नावाचे कायम स्वरूपाचे पहिले चित्रपटगृह १९०७ मध्ये कोलकातामध्ये सुरू केले.