Indian film actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | జమున | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट ३०, इ.स. १९३६ हंपी | ||
मृत्यू तारीख | जानेवारी २७, इ.स. २०२३ हैदराबाद | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
जमुना (३० ऑगस्ट १९३६ - २७ जानेवारी २०२३; पुर्वाश्रमीच्या निप्पानी ) ह्या एक भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक आणि राजकारणी होती ज्या मुख्यत्वे तेलुगू सिनेमात दिसल्या. [१] त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी डॉ. गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू (१९५३), [२] मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि एल.व्ही. प्रसाद यांच्या मिसम्मा (१९५५) मधून त्यांना यश मिळाले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे.[३] त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार आणि साऊथ फिल्मफेअर पुरस्कारमध्ये पुरस्कार जिंकले. त्या ९ व्या लोकसभेत (१९८९-९१) राजमुंद्री मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार होत्या.
जमुना यांचा जन्म सध्याच्या कर्नाटकातील हम्पी येथे कन्नड भाषिक निप्पाणी श्रीनिवास राव आणि तेलुगू भाषिक कौसल्या देवी यांच्या पोटी झाला होता. त्यांचे नाव जनाबाई होते. त्यांचे वडील मध्व ब्राह्मण होते, तर आई वैश्य होती व परिणामी हा आंतरजातीय प्रेमविवाह होता.[४] जमुना आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यातील दुग्गीराला येथे वाढल्या. [२] त्यांचे वडील हळद आणि तंबाखूच्या व्यवसायात गुंतले होते आणि ती सात वर्षांची असताना त्यांचे कुटुंब तेथे गेले.[४] अभिनेत्री सावित्री गणेशन दुग्गीराला नाटक करत असताना त्या जमुनाच्या घरी राहायच्या व नंतर त्यांनी जमुनाला चित्रपटात काम करण्यासाठी आमंत्रित केले. जमुना यांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटांमध्ये नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली.[२][५]
जमुना शाळेत नाटक कलाकार होत्या. त्यांच्या आईने त्यांना गायन संगीत आणि हार्मोनियम शिकवले. १९५२ मध्ये, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे डॉ. गार्किपती राजा राव यांनी त्यांचा माँ भूमी हे नाटक पाहिला आणि त्यांना पुट्टील्लू चित्रपटात भूमिका देऊ केली. [२]
जमुनाने तेलुगू आणि इतर दक्षिण भारतीय भाषांमधील १९८ चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला जसे मिलन (१९६७) ज्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. ही मूळ तेलुगू चित्रपट मूगा मनसुलु (१९६४) मधील त्यांच्या भूमिकेची पुनरावृत्ती होती.
जमुना यांनी तेलुगू कलाकार संघटना देखील स्थापन केली आणि त्याद्वारे २५ वर्षे सामाजिक सेवा केली.[६]
जमुना १९८० च्या दशकात काँग्रेस पक्षात सामील झाल्या आणि १९८९ मध्ये राजमुंद्री मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या.[७] त्यांनी १९९१ च्या निवडणुकीत पराभव मिळवला आणि राजकारण सोडले, परंतु १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजपचा देखील प्रचार केला.[८]
१९६५ मध्ये जमुनाने एसव्ही विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक जुलुरी रमण राव यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा, वामसी जुलुरी आणि एक मुलगी, स्रावंती जुलुरी आहे जे हैदराबादयेथे राहत होते. १० नोव्हेंबर २०१४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने जुलुरी रमण रावांचे निधन झाले. २७ जानेवारी २०२३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी जमुना यांचे हैदराबाद येथील घरी निधन झाले.[९][१०]