जया पूरणप्रकाश शर्मा (१७ सप्टेंबर, १९८०:गाझियाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००२-०८ दरम्यान १ कसोटी, ७७ एकदिवसीय आणि १ एक टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यगती गोलंदाजी करी असे. शर्मा भारताच्या २००५ विश्वचषक संघात होती. ही दिल्ली, रेल्वे आणि राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली.
हिला २००७मध्ये बीसीसीआयने आपला पहिला प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दिला. [२] २००५-६ महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धची तिची १३८* धावांची खेळी ही भारतासाठी महिला एकदिवसीय सामन्यांमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. [३]