पुआन श्री पद्मा श्री दातिन जानकी आती नाहप्पन तथा जानकी देवर (२५ फेब्रुवारी, १९२५:क्वालालंपुर, मलेशिया - ९ मे, २०१४:क्वालालंपुर, मलेशिया) या मलेशियाच्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. या मलेशियन इंडियन काँग्रेसच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुभाष चंद्र बोस यांचे आवाहन ऐकून आपले सोन्याचे दागिने दान करून टाकले. आपले वडील व इतर कुटुंबियांची परवानगी घेउन त्या आझाद हिंद फौजेच्या रानी झांसी रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या. कालांतराने त्या रेजिमेंटच्या उपसेनापतीही झाल्या.
१९४६मध्ये नाहप्पन यांनी जॉन थिवीसोबत मलायन इंडियन काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर नाहप्पन देवान नगराच्या सेनेटर झाल्या.
भारत सरकारने २०००मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.