जॉय मुखर्जी (२४ फेब्रुवारी, इ.स. १९३९; झाशी, ब्रिटिश भारत - ९ मार्च, इ.स. २०१२; मुंबई, महाराष्ट्र) हा बंगाली-भारतीय चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक होता.
इ.स. १९६० साली प्रदर्शित झालेल्या लव्ह इन सिमला या चित्रपटातील मुख्य नायकाच्या भूमिकेतून याने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. फिर वोही दिल लाया हूं, लव्ह इन टोक्यो व जिद्दी हे याचे गाजलेले चित्रपट होत.
जॉय मुखर्जी हिंदी चित्रपट निर्माते शशधर मुखर्जी व त्यांची पत्नी सतीदेवी यांचा पुत्र होता. शशधर मुखर्जी फिल्मालय स्टुडिओज् या ख्यातनाम हिंदी चित्रपटनिर्मिती कंपनीचे सहसंस्थापक होत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सुबोध मुखर्जी हे जॉय मुखर्जीचे काका, तर अशोककुमार, किशोरकुमार हे त्याचे मामा होत.
आयुष्याच्या अखेरच्या काळात जॉय मुखर्जीची फुप्फुसे निकामी झाली होती. उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलात ठेवले असताना ९ मार्च, इ.स. २०१२ रोजी त्याचे निधन झाले[१][२][३].
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |