जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. येथील लेणी इ.स. ५२० ते ५५० दरम्यानच्या काळात बनली असावीत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत. इतिहासकार व विद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मते, जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहेत आणि (एकूण लांबीच्या दृष्टीने) सर्वात मोठी आहेत.[१]
ही लेणी वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गालगत असून अतिक्रमणाने वेढलेली आहेत. लेण्यांच्या जागेत एक अनधिकृत मंदिरबांधले आहे. गुहेच्या प्रवेशद्वारावर सांडपाणी आहे.
या गुहांच्या जागेच्या मुख्य सभागृहामध्ये लांबट पायऱ्यांच्या प्रवासाद्वारे प्रवेश होतो. गुहेत बरेच खांब आहेत आणि शेवटी एक लिंगम आहे. दत्तात्रेयाची, हनुमानाची मूर्ती, आणि गणेश रांग आणि द्वारपालाचे अवशेष आहेत. या गुहेत देवी जोगेश्वरी (योगेश्वरी) नावाची एक मूर्ती आहे, तिच्यामुळे या लेण्यांना आणि पर्यायाने उपनगरालाच जोगेश्वरी हे नाव पडले आहे. काही मराठी लोकही या देवीला कुलदेवी मानतात आणि गुजरातचे काही स्थलांतरित गट देवीची पूजाही करतात.
Travel destinations around Mumbai