जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता

जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता
मुंबईच्या नकाशावर गडद निळ्या रंगात जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता
अंधेरी पूर्व येथील सीप्झजवळील एक फलक
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १०.६ किलोमीटर (६.६ मैल)
सुरुवात पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी
शेवट पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी
स्थान
शहरे मुंबई
जिल्हे मुंबई उपनगर जिल्हा
राज्ये महाराष्ट्र

जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता (Jogeshwari – Vikhroli Link Road; संक्षेप: जे.व्ही.एल.आर.) हा मुंबई शहरामधील एक प्रमुख हमरस्ता आहे. हा रस्ता जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो. जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, पवई इत्यादी उपनगरांमधून पवई तलावाच्या दक्षिणेकडून साधारणपणे पूर्वेकडे धावणारा हा रस्ता विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती महामार्गापाशी (राष्ट्रीय महामार्ग ३) संपतो. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असून आय.आय.टी. मुंबई ह्याच मार्गावर आहे.

१९९४ साली खुला करण्यात आलेल्या ह्या रस्त्याचे २०१२ साली मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले. ह्यासाठी विश्व बँकेने प्रायोजित केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील रुपये २२१.४५ कोटी इतका निधी वापरण्यात आला.