डान्स बार हा भारतातील बारसाठी वापरला जाणारा एक शब्द आहे ज्यामध्ये पुरुषांचे स्त्रियांद्वारे नृत्याच्या स्वरूपात प्रौढ मनोरंजन केले जाते ज्यासाठी त्यांना रोख रक्कम मिळते. डान्स बार फक्त महाराष्ट्रातच असायचे, पण नंतर ते देशभरात, प्रामुख्याने शहरांमध्ये पसरले.[१]
महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट २००५ मध्ये डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती,[२] ज्याला पहिल्यांदा १२ एप्रिल २००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते आणि जुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता.[३] महाराष्ट्र सरकारने २०१४ मध्ये एका अध्यादेशाद्वारे डान्स बारवर पुन्हा बंदी घातली, परंतु ऑक्टोबर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे देखील "असंवैधानिक" ठरवले आणि मुंबईतील डान्स बार पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली.[४]
१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे पहिले डान्स बार सुरू झाले.[५] पुणे जिल्ह्यातील पहिले डान्सबार हॉटेल कपिला इंटरनॅशनल येथे होते.[६]
भारतातील बार नृत्य हे कामुक नृत्य आणि पाश्चात्य जगामधील नाईट क्लब नृत्यापेक्षा स्पष्टपणे भिन्न आहे. एक प्रकारे, हे मनोरंजन म्हणून केलेल्या बेलीडान्ससारखे आहे. "बारबाला" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नर्तकी संपूर्ण कामगिरीमध्ये संपूर्णतः कपडे घालतात व काही पोटाचा व पाठीचा भाग आणि हात उघडे दाखवतात.[७] बार नृत्याचा कामुक पैलू बहुतेकदा सूचनेद्वारे साध्य केला जातो. महाराष्ट्रात, बारनृत्याचा पोशाख हा बहुधा साडी किंवा लेहेंगा - चोली असतो, तर बंगळुरूसारख्या इतर काही ठिकाणी त्यात पाश्चात्य पोशाख समाविष्ट असू शकतो. बार नृत्याची तुलना मुजराशी केली जाते, ज्यामध्ये स्त्रिया मुघल काळात पारंपरिकपणे तवायफ (गणिका ) द्वारे सादर केल्या जाणाऱ्या शास्त्रीय भारतीय संगीतावर नाचत असत.[८] [९]
डान्स बारच्या आसन व्यवस्थेच्या मध्यवर्ती केंद्रस्थानी, रंगीबेरंगी प्रकाश असलेल्या डान्स फ्लोअरवर बारबाला बॉलीवुड [१०] आणि इंडीपॉप गाण्यांवर नृत्य करतात.[११] दर्शक खोलीच्याभवती असलेल्या खुर्च्यांवर बसतात. नृत्य हा कमीतकमी हालचालींचा आहे ज्यात श्रोणिचे झटके, छाती भरणवण्या सारखे बॉलीवूड नृत्यातील वैशिष्ट्यपूर्ण हालचाली नाही. [१२] बऱ्याच वेळा, बारबाला उर्जेच्या संवर्धनासाठी ठराविक अदा सादरकरतात जोपर्यंत त्यांना एखादा दर्शक सापडत नाही ज्याचे त्यांना लक्ष वेधायचे असते. नंतर त्या ह्या ठराविक दर्शकासमोर नाचतात, क्षणभंगुर डोळ्यांचा संपर्क साधतात, इशारे करतात, हावभाव करतात किंवा सामान्यतः त्यांच्या लक्ष्यित दर्शकाला "आपण विशेष आहोत" असे वाटावे असे हावभाव बनवतात. दोघांमधील शारीरिक संपर्कास परवानगी नसते, आणि बारबाला अनेकदा डान्स फ्लोरच्या हद्दीत राहतात.[११] पुरुष वेटर हे एकमेकांच्या खूप जवळ येणाऱ्या दर्शक आणि नर्तकींवर घिरट्या घालतात जेणेकरून, दोघांमध्ये पैशासाठी लैंगिक सौदे होऊ नयेत.[८] दर्शक कधी-कधी मुलींवर चलनी नोटांचा वर्षाव करतात, ज्यामुळे सामान्यतः अधिक आनंदी नृत्यप्रकार होतो.[१२]
दर्शक त्याच्या पसंतीच्या नर्तिकेवर चलनी नोटांचा वर्षाव करतो. तो हे एकतर रोख रक्कम (१० किंवा २० रुपयांच्या नोटा) देऊन करतो. काही ठिकाणी तो नर्तिकेला रूपयांचा हारही घालत असे. उदार, समृद्ध आणि शक्यतो मद्यधुंद दर्शकांमुळेअनेक बारबाला अशा प्रकारे एका रात्रीत शेकडो रुपये कमवू शकतात. दिवसाच्या शेवटी, प्रत्येक मुलीची कमाई मोजली जाते आणि डान्स बार आणि मुलींमध्ये काही पूर्वनिर्धारित प्रमाणात ती विभागली जाते. डान्सबार दारू आणि चकणा विक्रीतून पैसे कमवतात. बऱ्याच महिलांनी महिन्याला १०,००० (US$२२२) पर्यंत कमाई केली आहे, यामुळे संपूर्ण भारतातील आणि अगदी दूर नेपाळ आणि बांग्लादेशातील महिलांना आकर्षित केले आहे. मुंबईच्या रेड-लाइट भागात डान्स बार हा काम करण्यापेक्षा जगण्याचा सुरक्षित मार्ग मानला जात असे.[७]
बारबालाच्या लोकप्रियतेवर व दिसण्यावर त्यांचे उत्पन्न अवलंबून असते. [१३] हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे की कमी लोकप्रिय मुलींना ६०% रक्कम दिली जाते. त्यात असेही म्हणले आहे की लोकप्रिय मुलींना मासिक पगार १,००,००० (US$२,२२०) ते
३,००,००० (US$६,६६०) मिळतो, तर बार मालक उरलेले सर्व पैसे त्यांच्याकडे ठेवतात.[१३]
डान्स बार मध्यरात्री बंद होते, परंतु २००० मध्ये सरकारने नियम बदलून त्यांना पहाटे १:३० पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली. तथापि, २००५ मध्ये मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर हे बदलून १२:३० वाजता करण्यात आले.[१४][१५] एकदा डान्स बार बंद झाले की, बार मालक बारबालांना घरी जाण्यासाठी सुरक्षित वाहतूक देतात. यातील अनेक मुलींची लग्ने झालेली असून त्यांना मुले देखील असतात. त्यांचे ग्राहक समाजाच्या सर्व स्तरातील आहेत, ज्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, कॉर्पोरेट कामगार आणि अगदी शाळकरी मुले देखील आहेत जे डान्स बारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लाच देतात.[१६]
पोलिस आणि स्थानिक ठगही डान्सबारमधून नियमित हफ्ता काढून पैसे कमवतात.[१७] डान्स बार हे गुन्हेगारांसाठी भेटीचे ठिकाण म्हणून काम करतात, त्यामुळे ते पोलिसांकडून गुप्तचर माहिती गोळा करण्याचे केंद्र बनतात.[१८]
राजकीय भवितव्य वाढवण्यासाठी आणि नैतिकतावादी जनतेची मर्जी राखण्यासाठी डान्सबार बंद करण्यासाठी कायदे करण्यात आले आणि न्यायालयीन खटलेही दाखल करण्यात आले.[१९]
नोव्हेंबर २००२ मध्ये ग्रँट रोड, मुंबई येथील एका डान्स बारमध्ये एका रात्रीत घोटाळेबाज अब्दुल करीम तेलगीने सुमारे ९३,००,००० (US$२,०६,४६०) खर्च केले [१३]मटका किंगपिन सुरेश भगत यांचा मुलगा हितेश याने डान्स बारमध्ये दोन वर्षांसाठी प्रति रात्र
२,००,००० (US$४,४४०) खर्च केल्याचा आरोप आहे.[१३]
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील समाजवादी पक्षाचे आमदार महेंद्र सिंह यांच्यासह अन्य पाच जणांना गोवा पोलिसांनी २६ ऑगस्ट २०१३ रोजी पणजी येथील डान्सबारवर छापा टाकून वेश्याव्यवसाय विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती.[२०] पोलिसांनी सांगितले की त्यांनी सिंगला हॉटेलमधील मुजरा पार्टीतून अटक केली आणि सहा महिला नर्तक ज्यांची सुटका करण्यात आली, त्या मुंबई, दिल्ली आणि चंदीगड येथून बोलावलेल्या वेश्या होत्या.[२१][२२]
चांदनी बार सारख्या अनेक चित्रपटांचा विषय डान्स बार आहे. बॉलीवूड चित्रपटांमधील आयटम गाण्यांमध्ये देखील डान्स बार नियमितपणे दाखवले जातात.[२३]