प्रकार | सार्वजनिक |
---|---|
शेअर बाजारातील नाव |
बी.एस.ई.: 500096 एन.एस.ई.: DABUR |
उद्योग क्षेत्र | ग्राहकोपयोगी वस्तू |
स्थापना | १८८४ |
मुख्यालय | डाबर कॉर्पोरेट ऑफिस, कौशांबी, साहिबाब, गाझियाबाद, उत्तर प्रदेश, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | जगभर |
महत्त्वाच्या व्यक्ती |
|
उत्पादने |
आरोग्यासाठीचे पूरकपदार्थ ओटीसी आणि आयुर्वेदिक औषधे वैयक्तिक उत्पादने |
महसूली उत्पन्न | ८८.२९ billion (US$१.९६ अब्ज)२०१८ - २०१९19)[१] |
निव्वळ उत्पन्न | 14.46 अब्ज (US$३२१.०१ दशलक्ष) (2018-19) [१] |
कर्मचारी | ७२४३ (२०१६ - २०१७)[२] |
पोटकंपनी |
|
टीपा: पोटकंपन्या [३] |
डाबर (दत्तार बर्मन या व्यक्तिनावापासून तयार झालेला शब्द) [४][५] ही भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. ही १८८४ मध्ये एस के. बर्मन यांनी स्थापन केली होती. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक ग्राहक उत्पादने तयार करते.[६] ही भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात ग्राहक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
डॉ. एस. के. बर्मन कोलकाता येथे आयुर्वेदाचे अभ्यासक होते. १८८० च्या दशकाच्या मध्यात बर्मन यांनी कॉलरा, बद्धकोष्ठता आणि मलेरिया यासारख्या आजारांसाठी आयुर्वेदिक औषधे तयार केली. १८८४मध्ये त्यांनी आपल्या आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी डाबर इंडिया लिमिटेड सुरू केली. त्यांचा मुलगा सी.एल. बर्मन यांनी डाबरचे पहिले आर अँड डी (रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट) युनिट स्थापन केले. सध्याचे अध्यक्ष डॉ. आनंद बर्मन आणि उपाध्यक्ष अमित बर्मन हे बर्मन कुटुंबातील पाचवी पिढी आहे. १९९८ मध्ये जेव्हा त्यांनी कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिकांना दिले, तेव्हा बर्मन हे व्यवस्थापनापासून मालकी हक्क वेगळे करणाऱ्या भारतातील पहिल्या व्यावसायिक कुटुंबांपैकी एक होते.[७]