डिकिन्सन थियोडोर रूझवेल्ट प्रादेशिक विमानतळ

डिकिन्सन थियोडोर रूझवेल्ट प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: DIKआप्रविको: KDIKएफ.ए.ए. स्थळसूचक: DIK) तथा डिकिन्सन म्युनिसिपल विमानतळ अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील डिकिन्सन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या दक्षिणेस सहा मैलांवर स्टार्क काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ डिकिन्सन विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे. []

हा विमानतळ पश्चिम नॉर्थ डकोटा, पूर्व मोंटाना आणि वायव्य साउथ डकोटा या प्रदेशांना विमानसेवा देतो. येथे फक्त एक विमानकंपनी, युनायटेड एक्स्प्रेस, डेन्व्हर ला सीआरजे-२०० विमानाने प्रवासी नेते-आणते. पूर्वी डेल्टा कनेक्शन मिनियापोलिस-सेंट पॉलला जात असे.[]

या विमानतळाला अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्टचे नाव देण्यात आले आहे.

विमानतळावरील एकमेव दार्

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान संदर्भ
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर []

युनायटेड एक्सप्रेस स्कायवेस्ट एरलाइन्सद्वारे सीआरजे-२०० विमाने वापरते.

मालवाहतूक

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान संदर्भ
आन्कोर एर कार्गो बेमिद्जी एरलाइन्स द्वारे फार्गो []
फेडेक्स फीडर कॉर्पोरेट एर द्वारे फार्गो []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ FAA Airport Form 5010 for DIK PDF. Federal Aviation Administration. effective October 7, 2021.
  2. ^ Kessler, Abby (October 19, 2015). "Delta Airlines to suspend jet service to Dickinson". Grand Forks Herald. Grand Forks Herald and Forum Communications Company. 2019-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 15, 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "United Airlines Route Map". United Airlines. February 22, 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "FlightAware Encore Air Cargo 1541". रोजी मूळ पानापासून संग्रहितFebruary 22, 2020. February 22, 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  5. ^ "FlightAware FedEx Feeder 7555". रोजी मूळ पानापासून संग्रहितFebruary 22, 2020. February 22, 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)