डेबॉइन द्वीपसमूह हे पापुआ न्यू गिनीतील छोटी द्वीपे व प्रवाळी बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह लुईझिएड द्वीपसमूहाच्या उत्तरेस मिसिमापासून १३ किमी तर तोरलेसी द्वीपसमूहापासून ५ किमी वर आहे. पानाएती, पानापॉमपॉम, ब्रूकर, वेर ही यातील काही द्वीपे आहेत.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या आरमाराने येथे तळ उभारला होता.