तनुज विरवानी हा एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे जो बॉलीवूड उद्योगात सक्रिय आहे. २०१७ च्या ऍमेझॉन ओरिजिनल दूरचित्रवाणी मालिका इनसाइड एज मधील वायु राघवनच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने अल्ट बालाजीच्या कोड एम (२०२०) मध्ये आणि झी५ च्या सर्वात यशस्वी शो पॉयझन (२०१९) मध्ये भूमिका साकारल्या आहेत.[१] याआधी त्याने वन नाईट स्टँड (२०१६)[२] या थ्रिलरमध्ये सनी लिओनीसोबत काम केले आहे. एक अभिनेता असण्यासोबतच त्याने दिग्दर्शन आणि लेखनातही खूप रस दाखवला आहे आणि अनेक सामाजिकदृष्ट्या संबंधित लघुपट बनवले आहेत. तो वूट सिलेक्टच्या लोकप्रिय वेब सिरीज इल्लीगल (२०२०) मध्ये दुसऱ्या सीझनमध्ये दिसला होता.
तो अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा आहे.[३] २०१३ मध्ये जो राजन दिग्दर्शित लव यू सोनियो या हिंदी चित्रपटातून त्याने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात केली.[४] तो पुढे 2014 मध्ये तनुश्री चटर्जी बसू दिग्दर्शित पुरानी जीन्स या चित्रपटात दिसला.