तेनकाशी हा भारतातील तमिळनाडू राज्याच्या ३८पैकी एक जिल्हा आङे. या जिल्ह्याची निर्मिती २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी तिरुनेलवेली जिल्ह्यामधून करण्यात आली.
या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र तेनकाशी येथे आहे. [१]
तेनकाशी जिल्ह्याच्या दक्षिणेला तिरुनेलवेली जिल्हा, उत्तरेला विरुधुनगर जिल्हा, पूर्वेला थुथुकुडी जिल्हा आणि पश्चिमेला केरळच्या कोल्लम आणि पठानमथिट्टा जिल्हे आहेत. जिल्ह्याचा पश्चिम भाग पश्चिम घाटात आहे तर पूर्वेकडे प्रामुख्याने सपाट मैदाने आहेत.
तेनकाशी जिल्ह्याची रचना सहा तालुक्यांनिशीकेलगेली आहेत --
त्यानंतर आणखी दोन तालुके निर्माण करण्यात आले --
२०११ च्या जनगणनेनुसार तेनकाशी जिल्ह्याची लोकसंख्या १४,४०,७९५ होती. जिल्ह्यात ६,९७,६३५ पुरुष आणि ७,४३,१६० स्त्रिया आहेत आणि लिंग गुणोत्तर 1065 स्त्रिया प्रति 1000 पुरुष आहेत. [२]