कंपनीचे मुख्यालय | |
स्थानिक नाव | 東洋水産株式会社 |
---|---|
प्रकार | सार्वजनिक कंपनी, काबुशिकी कैशा |
शेअर बाजारातील नाव | साचा:तोक्यो स्टॉक |
उद्योग क्षेत्र | अन्न प्रक्रिया |
स्थापना | (मार्च 25, 1953 | )
संस्थापक | काझुओ मोरी |
मुख्यालय | कोनान, मिनाटो, तोक्यो १०८-८५०१, जपान |
सेवांतर्गत प्रदेश | जगभर |
महत्त्वाच्या व्यक्ती |
तदासु त्सुत्सुमी (चेअरमन) मसानारी इमामुरा (अध्यक्ष) |
उत्पादने |
|
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | ▼ येन ८९.८२५ बिलियन (आर्थिक वर्ष २०२२)[१] |
निव्वळ उत्पन्न | ▼ येन २२.४१५ बिलियन (आर्थिक वर्ष २०२२)[२] |
कर्मचारी | ४,७४५ (३१ मार्च २०२३ नुसार) |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
टीपा: [३][४] |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तोयो सुईसान कैशा लिमिटेड (東洋水産 ) किंवा तोयो सुईसान कबुशिकी - गेशा ही एक जपानी कंपनी आहे. ही कंपनी तोयो सुईसान म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी तीच्या सीफूड, गोठविलेले आणि रेफ्रिजरेटेड खाद्यपदार्थांद्वारे तसेच मारुचान ब्रँडद्वारे विकल्या जाणाऱ्या रामेन नूडल्साठी विशेष प्रसिद्ध आहे.[५] ही चौथी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सागरी खाद्य पुरवणारी कंपनी आहे.[६]
या कंपनीची स्थापना १९५३ मध्ये काझुओ मोरी यांनी सागरी उत्पादने निर्यातदार, देशांतर्गत खरेदीदार आणि वितरक म्हणून केली होती. १९५५ मध्ये कोल्ड-स्टोरेज व्यवसायात प्रवेश केला. १९५६ मध्ये फिश सॉसेजसारख्या प्रक्रिया केलेल्या समुद्री खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करण्यास या कंपनीने सुरुवात केली.
तोयो सुईसान आणि त्याच्या एकत्रित उपकंपन्यांनी नंतर झटपट नूडल्स, ताजे नूडल्स आणि फ्रोझन फूड्स यासह इतर व्यवसाय क्षेत्रात विस्तार केला.
ग्राहक-प्रत्यक्ष खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, कंपनी व्यावसायिक खाद्य सेवा उद्योगासाठी विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांची विक्री करते, ज्यामध्ये रेस्टॉरंट्स, विशेष स्टोर्स आणि औद्योगिक खाद्य सेवा यांचा समावेश आहे. [५]
कंपनी युनायटेड स्टेट्समध्ये तीन पूर्णपणे मालकीच्या कंपन्या चालवते: मारुचान इंक, अर्वाईन, कॅलिफोर्निया स्थित, मारुचान व्हर्जिनिया इंक, रिचमंड स्थित आणि मारुचान टेक्सास इंक, वॉन ऑर्मी, टेक्सास स्थित आहेत. त्यांचा पोर्टलॅंड, ओरेगॉन येथील अजिनोमोटो फूड्स नॉर्थ अमेरिका, इंक. सोबत अजिनोमोटो टोयो फ्रोझन नूडल्स नावाचा संयुक्त उपक्रम आहे.[७]
झटपट (इन्स्टंट) नूडल्स : जपानी इन्स्टंट कप नूडल्सची मालिका, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक आहे. इतर उत्पादनांमध्ये नॉन-फ्राईड नूडल्स आणि इन्स्टंट नूडल्सच्या उभ्या-प्रकार कप मालिका समाविष्ट आहेत.
ताज्या नूडल्स : तोयो सुईसानच्या ताज्या नूडल्सचा जपानमधील ताज्या नूडल मार्केटमध्ये सर्वाधिक वाटा आहे. १९७५ मध्ये सुरू केलेले, सान्शोकु (“थ्री पॅक”) याकिसोबा हे जपानमध्ये सर्वाधिक विकले जाणाऱ्या ताज्या नूडल्स आहेत. सान्शोकु उडॉन नूडल्स (शेल्फ लाइफ १५ दिवस), आणि मुकाशी नगारा नो चुका सोबा नूडल्स ही इतर उत्पादने आहेत.