दलित विचारांचे नियतकालीक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | नियतकालिक | ||
---|---|---|---|
स्थापना |
| ||
| |||
दलित व्हाईस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगलोर येथून प्रकाशित होणारे इंग्रजी राजकीय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे नंतरचे पूर्ण नाव "दलित व्हाईस : द व्हाईस ऑफ पर्सिक्यूटेड नॅशनॅलिटीज डिनाईड ह्यूमन राईट्स" असे होते. हे दर पंधरवड्याला आंतरजालावर आणि छापील स्वरूपातही प्रकाशित होत असे. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती,[१] हे एके काळी सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते.[२] हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले.[३]
कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाने या मासिकाचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे,
"ह्याचे चारित्र्यच मुळात ब्राम्हणवाद-विरोधी, जातिवाद-विरोधी आणि वर्णद्वेष विरोधी भूमिका असलेले आहे, ह्यांतून ब्राह्मणवादापासून मुक्तीचा पुरस्कार केला जातो. हे स्वतःला "भारतातील सर्व वंचितांचे, मानव्याचे हनन झालेल्या सर्वांचा प्रवक्ता मानते", — दलित, मागास जाती, ख्रिस्ती, मुसलमान, शीख, महिला — "सर्व आर्य ब्राह्मणवादाच्या वळी ठरलेल्यांचे"[४]
या मासिकामधील प्रकाशित लेखांमधून हिंदू धर्म, झियोनिझम, यहुदी धर्म, साम्यवाद आणि अमेरिकन नव-प्रतिगामित्ववाद (American neoconservatism) यांच्यावर हल्ला केला गेला.[५][६][७][८][९]
|title=
at position 85 (सहाय्य)
|deadurl=
ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)